Download App

मंदिर प्रशासनाचा अजब निर्णय, तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांना ड्रेसकोड

Tuljabhavani temple : त्र्यंबकेश्वर मंदिरात केवळ हिंदूंनाच प्रवेश दिला जाणार आहे. हिंदूंशिवाय मंदिरात जाण्यास सक्त मनाई आहे, अशा आशयाचे फलक त्र्यंबकेश्वरमध्ये लावले असतानाच आता तुळजापुरच्या मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थाने एक नियमवाली जारी केली आहे. यामध्ये मंदिर परिसरात असभ्य कपडे (Dress code) घालण्यास बंदी घातली आहे.

आता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जायचे असेल तर भाविकांना पारंपारिक आणि सभ्य कपडे घालावे लागणार आहेत. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करुन येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक आजपासून मंदिरात लावण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा, असा सल्ला देखील फलकावरुन देण्यात आला आहे.

Kangana Ranaut : हिंदुत्व अन् राजकारणावर बोलणं कंगनाला भोवलं! स्वतःच सांगितला नुकसानीचा आकडा

बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे घातलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही, अशी नियमावलीचे फलक मंदिरात लावण्यात आले आहेत. 18 मे रोजी मंदिर आणि मंदिर परिसरात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय संस्कृती संदर्भात बोर्ड लावण्यात आले आहेत. यानिमित्ताने मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन सौदागर तांदळे व सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे यांचा सर्व पुजारी वर्गाने सत्कार करण्यात आला. यावेळी अधिकारी आणि कर्मचारी तसेच सुरक्षारक्षक उपस्थित होते.

मंदिराच्या परिसरात महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. फक्त महिलांना नाही तर पुरुषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालता येणार नाहीत. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी विविध नियम आहेत.

Tags

follow us