Kangana Ranaut : हिंदुत्व अन् राजकारणावर बोलणं कंगनाला भोवलं! स्वतःच सांगितला नुकसानीचा आकडा

Kangana Ranaut : हिंदुत्व अन् राजकारणावर बोलणं कंगनाला भोवलं! स्वतःच सांगितला नुकसानीचा आकडा

Kangana Ranaut : कंगना रणौत ही सोशल मीडियावर (Social media) काही ना काही वादग्रस्त विधानांमुळे ट्रोल केले जात असते. तर कधी पोस्टच्या माध्यमातून कोणाचे तरी कौतुक करत असते. बऱ्याचदा कंगना देशातील महत्त्वाच्या समस्यांबद्दल भाष्य करत असते. याबरोबरच ती तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची मते बिनधास्तपणे आणि परखडपणे मांडत असते. कंगनाच्या याच गुणांमध्ये ती अनेकवेळा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)


‘हिंदुत्व (Hinduism) आणि राजकीय विषयांवर (Political) भाष्य करणे कंगना रणौतला चांगलेच महागात पडले होते. खुद्द कंगनाने पोस्ट करत याबाबत मोठा खुलासा केला आहे. कंगना रणौतने अलीकडेच इलॉन मस्कच्या (Elon Musk) पोस्टवर तिच्या प्रतिक्रियेत लिहिले आहे की, हिंदुत्वावर वक्तव्ये केल्यामुळे आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य केल्याने मला खूप त्रास सहन करावा लागला आहे. तिला अनेक ब्रॅण्डमधून वगळण्यात आले आहे. यामुळे तिचे सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

तसेच यावर बोलताना कंगना रणौतने ॲलन मस्कीची एक बातमी शेअर केली आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘मला जे पाहिजे ते मी बोलेन, जरी मला आर्थिक नुकसान सहन करावे लागले तरी’ हे विधान शेअर करताना कंगनाने लिहिले की खरे स्वातंत्र्य आणि यशाचे चरित्र. हिंदुत्वासाठी बोलणे, राजकारणी, देशद्रोही, तुकडे गॅंग, यांच्या विरोधामध्ये वक्तव्य केल्याने त्यांनी मला एका रात्रीतून २० ते २५ ब्रॅण्डच्या जाहिरातींमधून काढून फेकले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)


तसेच कंगनाने पुढे सांगितले आहे की यामुळे मला प्रत्येकवर्षी ३० ते ४० कोटी रुपयांचे मोठे नुकसान होत असल्याचे यावेळी तिने यावेळी सांगितले आहे. हे सगळे माझ्या बाबतीमध्ये झाले असले तरी मला जे करायचे आहे ते बोलण्यापासून मला कोणी देखील रोखू शकत नाही. तिने केलेल्या पोस्टमध्ये कंगनाने इलॉन मस्कचे कौतुक केले आणि सांगितले आहे की, प्रत्येक जण आपली कमजोरी दर्शवतो. निदान श्रीमंतांनी तरी या पैशाचा विचार करू नये. कंगनाच्या वर्कफ्रण्टविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच ‘चंद्रमुखी-२’मध्ये चाहत्यांना दिसून येणार आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

या सिनेमाचे दिग्दर्शन पी. वासू यांनी केले आहे. हा सिनेमा १५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार असलायची चर्चा रंगत आहे. ‘चंद्रमुखी-२’ हा २००५ मध्ये आलेल्या तमिळ क्लासिक चित्रपट ‘चंद्रमुखी’चा सिक्वेल असणार आहे. शिवाय ती ‘इमर्जन्सी’मध्ये देखील दिऊन येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या सिनेमात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय ‘तेजस’ चित्रपटातही दिसणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube