Download App

रील बनवणं जीवावर बेतलं; कार चालवताना रेसवर पडला पाय, 500 मीटर दरीत कोसळून मृत्यू

रील बनवत असताना कार चालवली. मागे दरी होती. रेसवर पाय पडला. कार दरीत कोसळून मुलीचा मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Reel Shooting Car fell : रील बनववण जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. (Car Accident) मित्रासोबत मोबाईलवर रील बनवताना युवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (PM Modi) कार चालवताना ॲक्सिलरेटरवर पाय पडून कार वेगात मागच्या सुमारे ५०० मीटर दरीत कोसळी. (Reel) या अपघातातच युवतीचा मृत्या झाला. तर कारचा चक्काचूर झाला. श्वेता दीपक सुरवसे (२३) रा. हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर असं मृत युवतीचं नाव आहे.

कार चालवून बघते

मित्र शिवराज संजय मुळे आणि श्वेता सुरवसे हे छत्रपती संभाजीनगर येथून कारने (एमएच २१ बीएच ०९५८) शूलिभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले होते. या ठिकाणी ते मोबाइलवर फोटो काढण्यासह रील्स बनवत होते. श्वेताने शिवराजला ‘मी पण कार चालवून बघते, तू शूटिंग कर, असं म्हणत ती ड्रायव्हिंग सीटवर बसली.

थांब म्हणेपर्यंत कार दरीत Pune Car Accident: पोलिसांकडं भक्कम पुरावे; जूनअखेर आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता

या वेळी कार चालू करून ती रिव्हर्स गिअरमध्ये मागे नेत होती. मात्र, दरी जवळ आली तरी तिला ब्रेक दाबता न आल्याने कार दरीत कोसळली. त्यामध्ये तीला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, कार दरीत पडण्याची शक्यता दिसताच शिवराज श्वेताला ‘थांब थांब असं जोरात ओरड राहिला. मात्र, तोपर्यंत कार डोंगरावरून कोसळून मागील खोल दरीत कोसळली.

follow us

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज