Chhatrapati Sambhajinagar Collector : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील घरकुल घोटाळा चर्चेत आहे. या प्रकरणात ईडीने संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय (Astikkumar Pandey) यांना ईडीकडून नोटीस (ED notice) देण्यात आली आहे. पाण्डेय यांना आज मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी याच प्रकरणात महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे (Aparna Thete) यांची देखील मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेतील 40 हजार घरे बांधण्यासाठी चार हजार कोटी रुपयांच्या बांधकाम निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र निविदा प्रक्रियेत कंपनीकडून घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आहे.
‘The Kerala Story’ सिनेमावरून असदुद्दीन ओवैसी यांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल, म्हणाले…
या प्रकारणात सुरुवातीला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पुढे या प्रकरणात ईडीची एन्ट्री झाली. ज्या कंपन्यांना काम मिळाले होते, त्या कंपनीशी संबंधित लोकांवर ईडीने एकाचवेळी 9 ठिकाणी छापेमारी केली होती.
कुस्तीगीरांच्या आंदोलनात खाप पंचायतीची एंट्री, केंद्र सरकारला अल्टिमेटम
पुढे या प्रकरणात ईडीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मुंबई कार्यालयात बोलावून त्यांची चौकशी देखील केली होती. दरम्यान आता याच प्रकरणात तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना ईडीकडून नोटीस देण्यात आली आहे. तर पाण्डेय आज मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे देखील समोर आले आहे.