कुस्तीगीरांच्या आंदोलनात खाप पंचायतीची एंट्री, केंद्र सरकारला अल्टिमेटम

कुस्तीगीरांच्या आंदोलनात खाप पंचायतीची एंट्री, केंद्र सरकारला अल्टिमेटम

Protest Against BrijBhushan Singh: अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर (Jantar Mantar) कुस्तीपटूंची निदर्शने सुरु आहेत. या निदर्शनाला अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. त्याचबरोबर आता सामाजिक पातळीवरुन देखील पाठिंबा वाढतो. हरियाणातील खाप पंचायतींचे (Khap Panchayat) सदस्य या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

खाप पंचायतींसोबत पंजाबच्या शेतकरी संघटनांनीही सहभाग घेतला आहे. त्यांनी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. यासाठी सरकारला 20 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला. 20 मे पर्यंत कारवाई न झाल्यास 21 तारखेला मोठा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

आगामी निवडणुकांबाबत ओवेसींनी केली मोठी घोषणा…अशी असणार रणनीती

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले की, हे आंदोलन खेळाडूंकडून चालवले जाईल. कुस्तीगीरांना पाठिंबा देण्यासाठी खापमधून दररोज 11 सदस्य पाठवले जातील. ते म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणात मोदी सरकारला प्रश्न का केले जात नाहीत? बृजभूषण सिंग यांना आजपर्यंत का अटक करण्यात आली नाही.

आझाद समाज पक्षाचे चंद्रशेखर यांनीही खुले आव्हान देत, मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी बळकट करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कुस्तीगीरांना पाठिंबा देण्यासाठी मी दोन वेळा जंतरमंतरवर गेलो असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही 7 दिवसांची मुदत दिली आहे. मागण्या मान्य न झाल्यास मी पैलवानांसह तिथेच बसेन.

Malaika Arora: बॅकलेस ड्रेसमध्ये मलायकाचा बोल्ड अंदाज, अभिनेत्रीला पाहून उडाली अनेकांची झोप

त्याचबरोबर कुस्तीपटूंच्या या प्रदर्शनाला पाठिंबा देत चार राष्ट्रीय महिला संघटनांनी संयुक्त राष्ट्रव्यापी आंदोलन पुकारले आहे. ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशन, ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमेन्स ऑर्गनायझेशन, इंडियन वुमेन्स नॅशनल असोसिएशन, ऑल इंडिया वुमेन्स कल्चरल ऑर्गनायझेशन यांनी कुस्तीगीरांशी संवेदना व्यक्त केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube