आगामी निवडणुकांबाबत ओवेसींनी केली मोठी घोषणा…अशी असणार रणनीती

Untitled Design   2023 05 08T142359.506

Asaduddin Owaisi : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात अनेक पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु केली आहे. यातच कोठे व किती जागांवर आपले उमेदवार उभे करायचे? यावर पक्षातील नेत्यांच्या चर्चा देखील सुरु आहे. यातच ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन’ (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी एक मोठी घोषणा केलीय. आम्ही देशात सगळीकडे लोकसभा निवडणुका लढवणार आहे. तसेच राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो असे सूचक विधान त्यांनी केले आहे. दरम्यान आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने ओवेसी यांनी रणशिंग फुंकले असल्याचे म्हंटले जात आहे.

देशासह राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी विविध राजकीय पक्षांकडून केली जात आहे. यातच सध्या कर्नाटक मध्ये निवडणूक होत असल्याने या निवडणुकीत देखील अनेक पक्ष आपली ताकद अजमावून पाहत आहे. या ठिकाणी अनेक पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभा घेत विजयाचे दावे देखील केले आहे. दरम्यान AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी देखील या ठिकाणी जात मोदींसह सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला होता.

दरम्यान पत्रकारांशी बोलताना ओवेसी यांनी देशातील आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मोठे वक्तव्य केले आहे. आम्ही देशातील सर्व लोकसभा निवडणुका लढवणार आहे. मात्र किती जागांवर लढणार हे खासदार इम्तियाज जलील हे ठरवतील. ते औरंगाबाद येथून लढणार आणि मतदारांच्या जोरावर जिंकतील असा विश्वास ओवेसी यांनी व्यक्त केला.

तसेच पुढे बोलताना ओवेसी म्हणाले, महाराष्ट्रात कसे लढायचे याची रणनिती हे जलील हे ठरवणार आहे. आमचे शत्रू खूप आहेत… मात्र राजकारणात कोणीही कायमचा शत्रू हा राहत नसतो. त्यामुळे महाराष्ट्रात आमचे अनेक मित्र आहे. यामुळे आम्ही आगामी निवडणुका या संपूर्ण ताकदीने लढवू असा दावा ओवेसी यांनी केला आहे.

आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांवर सध्या पक्षांकडून उमेदवारांची देखील समीकरणे जुळवाजुळव सुरु आहे. यातच राज्यातील शिवसेनेत झालेल्या बंडानंतर प्रथमच ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट निवडणुकीत उतरणार आहे. यातच आता या निवडणुकांमध्ये AIMIM चा देखील सक्रिय सहभाग असणार आहे.

Tags

follow us