Maharashtra Elections : निलंगा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. चौकसभा आणि रॅलींनी वातावरण ढवळून निघाला आहे. या प्रचाराच्या माध्यमातून निलंगेकर नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रचार सभा आणि रॅलींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. संभाजी पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वातच मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला आहे, असे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघात ठिकठिकाणी आयोजित बैठकीत संवाद साधताना त्या बोलत होत्या. माजी मंत्री निलंगेकर यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रिपद असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लातूर जिल्हा आणि निलंगा मतदारसंघाचा विकास झाला आहे. माझ्याकडे शिक्षण आणि आरोग्य विभागाची जबाबदारी होती. या काळात जिल्हा परिषदेने उत्कृष्ट कामकाज केले. राज्यपातळीवर याची दखल घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कामाचीही दखल राज्य पातळीवर घेण्यात आली होती.
तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी आम्हाला निर्देश दिले होते. त्यांच्या नेतृत्वात मतदारसंघातील विकासकामांसाठी सर्वाधिक निधी खर्च करण्यात आला. प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका देण्यात आली. आरोग्य केंद्रांच्या इमारतींवर सोलर सिस्टीम बसवून विजेच्या बाबतीत आरोग्य केंद्रे स्वयंपूर्ण करण्यात आली, असे भारतबाई सोळुंके यांनी सांगितले.
प्रत्येक घराचा शाश्वत विकास करण्यावर आमचा भर असणार; संभाजी पाटील निलंगेकरांचा मतदारांना शब्द
‘लोकसभा निवडणुकीत फक्त नरेटिव्हमुळेच आमचा पराभव झाला असं म्हणणारा कार्यकर्ता मी नाही. कदाचित आमच्या कामातही काही गोष्टी कमी असतील. त्याचं आत्मपरिक्षण केलंय. ज्या ठिकाणी कमी होतो ते भरून काढण्याचा प्रयत्न निवडणुकीनंतरच्या सहा महिन्यांत आम्ही केलाय. आमच्या चुका आम्ही स्वीकारल्या. जनतेची माफीही मागितली. जनतेनेही ताकदीनं स्वीकारलं त्यामुळे मला विश्वास वाटतो की 2024 ला चांगलं रेकॉर्ड होईल, असा विश्वास संभाजी पाटील निलंगेकरांनी व्यक्त केला आहे.