Download App

जालन्यातून दानवे विजयाचा षटकार ठोकणार? विरोधकांना चकवा देणारा ‘एक्झिट पोल’

जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे हे सहाव्यांदा मैदानात आहेत. ते आता सहाव्यांदा षटकार मारणार असा अंदाज वर्तवला जातोय.

Image Credit: Letsupp

Jalana Loksabah Election 2024 Exit Poll : यावेळी लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील सर्वात जास्त चर्चेत राहिला तो जिल्हा म्हणजे जलना. या मतदासंघात सलग सहाव्यांदा भाजपकडून लोकसभेच्या मैदानात असणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे एक्झिट पोलनुसार विजयी षटकार मारतील अशी शक्यता आहे. (Lok Sabha Exit Poll ) मात्र, मराठा आंदोलनाचा मोठा फटका दानवे यांना बसणार असून यावेळी त्यांचा विजय अवघड असल्याच्या चर्चा राज्यभरात सुरू होत्या.

धोबीपछाड देणार   जालना : दानवेंचा षटकार की काळेंचा विजय?; जरांगेंची भोकरदन सभा ठरणारटर्निग पॉइंट

दानवे भाजपकडून तर दुसरीकडून महाविकास आघाडीचे डाॅ. कल्याण काळे हे मैदानात आहेत. दरम्यान, आपला विजय निश्चित असल्याच्या विश्वासातून मतदारसंघात काळे यांनी आभार दौरे सुरु केले आहेत. तर, रावसाहेब दानवे हे काहीसे शांत होते, त्यामुळे राज्यभरात त्यांच्या पराभवाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण राजकारणात विरोधकांना चकवा देण्यात पटाईत असलेले रावसाहेब दानवे सलग सहाव्यांदा प्रतिस्पर्धी उमेदवाराला धोबीपछाड देणार असल्याचा अंदाज एक्झीट पोलमधून वर्तवला जात आहे.

मतदारसंघात मोठा विरोध

हा अंदाज खरा ठरला तर जालना मतदारसंघातून सलग सहाव्यांदा विजय मिळवत दानवे षटकार ठोकणारे भाजपचे महाराष्ट्रातील पहिले नेते ठरतील. दोनवेळा आमदार आणि पाचवेळा खासदार म्हणून निवडून गेलेले रावसाहेब दानवे केंद्रात दोन वेळा राज्यमंत्री झाले. या शिवाय त्यांच्यावर भाजपने प्रदेशाध्य म्हणून जबाबदारी सोपवली होती. मागील काही काळात आपल्या ग्रामीण भाषा आणि शैलीसाठी ओळखले जाणारे रावसाहेब दानवे यांना मतदारसंघात मोठा विरोध असल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं आहे.

वाढलेला मतांचा टक्का कुणाच्या पथ्यावर

येथे शिवसेना शिंदे गट या महायुतीच्या घटक पक्षाने दानवे यांचे मनापासून काम केले नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. महाविकास आघाडीने 2009 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिलेल्या माजी आमदार कल्याण काळे यांनाच पंधरा वर्षांनी पुन्हा उमेदवारी देत दानवेंच्या विरोधात मैदानात उतरवले होते. 2009 मध्ये काळे यांचा निसटता म्हणजे अवघ्या आठ हजार मतांनी पराभव झाला होता. यावेळी जालना लोकसभा मतदारसंघात रेकाॅर्ड ब्रेक असं 70 टक्के मतदान झालं आहे. हा वाढलेला मतांचा टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं महत्वाचं आहे.

follow us

वेब स्टोरीज