हिवाळी अधिवेशापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार, महायुतीत गृहमंत्री पदावरून रस्सीखेच? रावसाहेब दानवेंनी केलं स्पष्ट

हिवाळी अधिवेशापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार, महायुतीत गृहमंत्री पदावरून रस्सीखेच? रावसाहेब दानवेंनी केलं स्पष्ट

Raosaheb Danve Reaction On Mahayuti Government Cabinet Expansion : विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Politics) लागल्यावर एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे नवं सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात व्यस्त आहे. राज्यात 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. त्यानंतर आता संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. यावर आता भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची प्रतिक्रिया समोर आलीय.

हिवाळी आधिवेशापूर्वी मंत्रीमंडळाची विस्तार केला (Mahayuti Government Cabinet Expansion) जाईल, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी या सरकार समोर कुठलाही आव्हान नाही, असं स्पष्ट केलं. त्याचसोबत ते म्हणाले की, सरकार राज्यात जनतेच्या उपयोगी योजना राबवणार आहे. तसेच महायुतीतील नेत्यांमध्ये गृहमंत्री पदावरून कुठलीही रस्सीखेंच (Mahayuti) नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत चांगलं काम केलंय. त्यामुळे माझ्या नावाची चर्चा काही कामाची नाही, असं देखील रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

पिंक बॉल टेस्टमध्ये कांगारूनी 10 विकेटने सामना जिंकला; टीम इंडियाला WTC Points Table मध्ये मोठा धक्का!

राज्यात मुखमंत्री आणि उपमुखमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर या तीन दिवसीय अधिवेशनात आमदारांची शपथ विधी होईल. 9 तारखेला अध्यक्ष पदाची निवड होईल. त्यानंतर हिवाळी आधिवेशापूर्वी मंत्रीमंडळाची विस्तार केला (Maharashtra Politics) जाईल, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलीय. मराठवाडयात कुणाला मंत्री पद मिळेल? याचा अधिकार आत्ता मुख्यमंत्र्यांना असल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

या वयात ‘असा’ खोटारडेपणा करायचा? चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांवर वार

राज्यात पुन्हा रावसाहेब दानवे भाजपाचे प्रदेशअध्यक्ष होतील अशी चर्चा सुरू आहे. त्यावर दानवे यांनी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीत अत्यंत चांगलं काम केलं असल्याचं सांगितलं. त्यांच्यामुळे चांगल्या जागा महायुतीला निवडून आणता आल्या, त्यामुळे माझ्या नावाची चर्चा काही कामाची नसल्याचं म्हणत प्रदेश अध्यक्षपदी बावनकुळे राहणार असल्याचं रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube