या वयात ‘असा’ खोटारडेपणा करायचा? चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांवर वार

या वयात ‘असा’ खोटारडेपणा करायचा? चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांवर वार

Chandrashekhar Bawankule Criticize Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मात्र विरोधकांनी ईव्हीएमवर निशाणा साधलाय. (Maharashtra Politics) निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर केल्याचा आरोप केला जातोय. मारकडवाडीत देखील ईव्हीएमवरून मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. विरोधकांनी सातत्याने हा मुद्दा उचलून घेतला आहे. बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक निवडणूक घ्या, अन्यथा राजीनामा देईल, असा इशारा उत्तम जानकर यांनी दिलाय. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची (Chandrashekhar Bawankule) प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिवसेनेच्या 3 नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवणार?, दिल्लीतून हिरवा कंदील आल्यावर होणार शिक्कामोर्तब

चंद्रशेखर बावनकुळे शरद पवार यांच्यावर बोलताना म्हणाले की, त्यांचा आम्ही सन्मान करतो. पण या वयात त्यांनी असा खोटारडेपणा करायचा?पराभव स्वीकारायला हवा.जनतेला कनफ्यूज करुन अपयश लपवण्याचं काम ते करत (Chandrashekhar Bawankule Criticize Sharad Pawar) आहेत. येणाऱ्या स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत पराजय होईल, ही भिती त्यांना आहे. मारकडवाडीत आलेले लोक हे पवार साहेबांचे माणसं जनता कुठे आहे. याआधी मारकडवाडीत ईव्हीएमवर मतदान झाले, तेव्हा आक्षेप घेतला नाही असं देखील बावनकुळे म्हणाले आहेत.

ईव्हीएमच्या नावावर बोंबाबोंब, लोकांची माथी भडकवायची…हा डाव; उदय सामंतांचा विरोधकांवर निशाणा

अपयश लपवण्याचं पाप पवार साहेब करत आहेत. जनता आता विकासाच्या बाजूने आहे. याआधी मारकडवाडीत ईव्हीएमवर मतदान झाले, तेव्हा आक्षेप घेतला नाही. कितीही नौटंकी केली पण महाराष्ट्र नौटंकीला कंटाळला आहे. जनता आता विकासाच्या बाजूने आहे. उत्तम जानकर यांच्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, हा खोटारडेपणा आहे. संविधानाचा अपमान आहे.

निवडणुकीत खरं तर लोकसभेचे 31 खासदार मविआचे निवडून आले, मग त्यांनी पण राजीनामे दिले पाहिजे. मविआला वाटतं ना? मग राजीनामे दिले पाहिजे. सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे. कितीतरी निवडणुका आम्ही हरलो, पण आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही. पराभवातुन शिकलो. या वयात किती खोट बोलणार? पराभवातुन शिका, असा टोला देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube