Raosaheb Danave : आमच्या पंगतीत जेवले अन् खरकटे तोंड घेऊन गेले; दानवेंचा शरद पवारांवर संताप

Raosaheb Danave : आमच्या पंगतीत जेवले अन् खरकटे तोंड घेऊन गेले; दानवेंचा शरद पवारांवर संताप

देशात मोदी सरकार (Modi government) सत्तेत आल्यापासून धर्मांधता आणि जातीयवाद वाढला असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात असतो. भाजप (BJP) जातीयवादी पक्ष आहे, अशी टीका विरोधकांनी अनेकदा केली आहे. आताही राज्यात ज्या राजकीय दंगली होत आहेत. त्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, भाजपला जातीयवादी पक्ष म्हणणाऱ्या विरोधकांचा भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी खरपूस समाचार घेतला. आम्हाला जायीयवादी म्हणणारे आमच्या पंगतीत बसून जेवले अन् खरकटे तोंड घेऊन गेले, अशी टीका त्यांनी केली. (Raosaheb Danve criticized Sharad Pawar, Mamata Banerjee, Nitish Kumar)

दानवे यांनी सांगितलं की, ममता बॅनर्जी म्हणतात भाजप जायीयवादी पक्ष आहे, शरद पवार म्हणतात भाजप जायीयवादी आहे, मायावती म्हणतात भाजप जायीयवादी आहे, फारुख अब्दुल्ला म्हणतात की, जायीयवादी आहेत. मग प्रश्न हा आहे की, आम्ही जातीयवादी आहोत तर, शरद पवार आणि आम्ही 1985 मध्ये पुलोदमध्ये एकत्र निवडणुका लढलो. आम्ही जातीयवादी आहोत, तर आमच्या सोबत का निवडणूक लढली? असा सवाल दानवेंनी केला.

Sharad Pawar : तुम्ही प्रश्न काहीही विचारा पण ‘हा’ शब्द मागे घ्या

ते म्हणाले, फारुख अब्दुल्ला यांचा मुलगा अटलजींच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात होता, मायावती भाजपसोबत दोनदा मुख्यमंत्री झाल्या, तर दुसरीकडे ममता बॅनर्जी अटलबिहारी वाजपेयींसोबत रेल्वे मंत्री होत्या. नितीशकुमार BJP च्या जीवावरच सीएम झाले होते, अशा सांगत त्यांनी विरोधकांची चांगलीच पोलखोल केली. हे जे विरोधक आम्हाला जातीयवादी म्हणत आहे, ते आमच्या पंगतीत बसून जेवले अन् खरकटे तोंड घेऊऩ निघून गेले, अशा शब्दात दानवेंनी टीका केली.

दरम्यान, 2024 मध्ये नरेंद्र मोदी हेच देशाच पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीची सत्ता आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. आता 2024 मध्ये देशात लोकसभेची निवडणुक आहे. या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांची एकजूट होते आहे. विरोधकांनी भाजपच्या विरोधात मोट बांधली. यावरूनही दानवेंनी विरोधकांची खिल्ली उडवली.

ते म्हणाले, विरोधक मोंदीसमोर टीकणार नाहीत. पंतप्रधानपदी मोदी विराजमान होऊ नये, यासाठी विरोधी पक्ष आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा, आधा हमारा, अशी विरोधकांची गत झाली, विरोधक मोट बांधून तिसऱ्या आघाडीचा विचार करत असले तरी तिसरी आघाडी यशस्वी होणार नाही, असं दानवे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube