Farmer cheated by pretending to be a PA : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा (Chandrashekhar Bawankule) पीए असल्याचा बनाव करून एका शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संभाजीनगरमधील पोलीस स्टेशनमध्ये (Sambhajinagar Police) अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. शेतकरी जगन्नाथ जयाजी शेळके यांनी ही तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
आपल्या आई, बहीण, मुलींचे CCTV फुटेज देऊ? निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांचा राहुल गांधींवर संताप
शेळकेंनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या अधिकृत फेसबुक पेजवर आपली मांडली होती. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं की, आजबाजूच्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवून त्यांच्या वडिलोपार्जित शेतीवर अतिक्रमण केल्यानं लागवड करता येत नाही. ही बाब शेअर केल्यावर काही वेळातच एका अज्ञात व्यक्तीने फोन करून स्वतःला चंद्रशेखर बावनकुळे यांचा पीए असल्याचे सांगितले आणि आपलं काम मार्गी लावण्याचं आश्वासन या भामट्याने शेतकरी दिलं. त्यासाठी क्यूआर कोडद्वारे पैसे मागितले. विश्वास ठेवून शेळके यांनी तीन हजार रुपये बतावणी करणाऱ्याला पाठवले, परंतु नंतर त्यांना फसवणुकीची जाणीव झाली.
पवार कुटुंबीय म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, तर अजित पवार..; हाकेंचा काका-पुतण्यांवर हल्लाबोल
फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर त्यांनी तातडीने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असून, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी, असं आवाहन केलं.