चिमूर शहरात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी; आक्रमक शिवभक्तांचा पोलीस स्टेशनला घेराव

Offensive status about Chhatrapati Sambhaji Maharaj In Chimur : इन्स्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले. त्यामुळे चंद्रपूरमधील चिमूर शहरातील शेकडो शिवभक्त आक्रमक होत त्यांनी तरुणाच्या अटकेची मागणी केली आहे. दरम्यान त्यांनी येथील १०.३० च्या सुमारास पोलीस स्टेशनला घेराव घातला. ज्यामुळे वाढलेल्या तणावाने दंगल नियंत्रण पथक व अतिरिक्त पोलीस कुमक बोलवण्यात आली. (Chimur) टिप्पणी करणाऱ्या युवकास मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.
राज्यात महापुरुषांविषयी चुकीचे मते मांडण्याची जणू चढाओढच लागल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या जिवनावर आधारीत छावा या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. अशात चिमूर शहरातील नेताजी वॉर्ड येथील २१ वर्षीय तरुणाने इन्स्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान पोस्ट केल्याने चिमूर शहरात मध्यरात्री तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सदरील तरुणाचा व संभाजीनगर येथील एका व्यक्तीचा हा संवाद आहे. या संभाषणात या तरूणाने आक्षेपार्ह वक्यव्य केले. याची माहिती चिमूर येथील काही युवकांना शुक्रवारी रात्री ८ वाजता मिळाली. त्यामुळे शहरातील शेकडो युवक व शिवप्रेमी एकत्र येत पोलीस स्टेशन चिमूर येथे घेराव घातला.
संभाजी महाराजांसारखा छळ, कारकुनाचा छळ कोणी करीत नाही, राणे-परबांमध्ये तू-तू मैं-मैं
धर्मजागरक जिल्हा संयोजक हरीचंद्र नथ्थुजी हटवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून तातडीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे यांनी युवकास अटक केली. चिमूर पोलिस स्टेशनमध्ये जमावाच्या तीव्र भावना लक्षात घेता आरोपीला भिसी पोलिस स्टेशनला पाठविण्यात आले. याची माहीती होताच भिसी पोलिस स्टेशन येथेही तरुणांचा जमाव गोळा झाला. त्यामुळे अखेर पोलिस बंदोबस्तात आरोपी तरुणास चिमूर पोलिस स्टेशनला आनण्यात आले. जमावावर नियंत्रणाकरीता बाहेरून पोलिस कुमक तथा दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले.
परिस्थिती पाहता सहाय्यक पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू , पोलिस उपअधीक्षक दिनकर ठोसर उपस्थित झाले.जमावाला नियंत्रीत करण्यात आले.यानंतर जमावाने नेहरू विद्यालय जवळील आरोपी तरुणाच्या दुकानासह इतर दुकांनाची तोडफोड व जाळपोळ करीत निषेध व्यक्त केला. अखेर पोलिसांना परिस्थितीवर ठेवण्यात यश आले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. रविवार ९ मार्चला सकल हिंदु समाजातर्फे चिमूर बंदचे आवाहन करण्यात आले असून पोलिस विभाग सतर्कतेने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.