Download App

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत पत्नी ठार तर पती गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर येथील आकाशवाणी चौकात अपघात होऊन पत्नी ठार झाली. तर, पती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Accident : छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या अपघाताची घटना घडली आहे. मुंबईहून एका कार्यक्रमासाठी शहरातील महेशनगर भागात आलेल्या दाम्पत्याला आकाशवाणी चौकात रस्ता ओलांडताना गॅस सिलिंडरच्या ट्रकने उडवलं. (Accident ) या अपघातात अनिता बाहेती या महिलेचा मृत्यू झाला. तर, पती रतीलाल बाहेती हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी रात्री 8 वाजता घडला.

दोघांना धडक 5000 कोटींचा मालक असणारा खासदार झाला मोदी सरकारमध्ये मंत्री! चंद्रबाबू नायडूशी आहे खास संबंध

मुंबई येथील डोंबिवलीत राहणारे रतीलाल बाहेती आणि अनिता बाहेती हे दोन दाम्पत्य महेशनगर भागात राहणार्‍या प्रा. धूत यांच्या घरी एका कार्यक्रमासाठी आलं होतं. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते दोघंजण आकाशवाणी चौकात आले. आकाशवाणी चौकातून रस्ता ओलांडत असताना भरधाव येणार्‍या एचपी कंपनीचे सिलिंडर घेऊन जाणार्‍या ट्रकने (एमएच 26 एच 5983) या दोघांना धडक दिली.

पत्नीचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत रतीलाल बाहेती हे रस्त्याच्या काही अंतरावर फेकले गेले तर अनिता रतीलाल बाहेती ही महिला ट्रकच्या चाकाखाली सापडली. त्यांना नागरिकांनी तत्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल. त्यानंतर डॉक्टरांनी अनिता बाहेती यांना तपासून मृत घोषित केलं.

पतीवर उपचार

या प्रकरणात ट्रक चालकाच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या अपघातातील जखमी रतीलाल बाहेती यांना आकाशवाणी चौकातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

follow us

वेब स्टोरीज