Download App

खुमखूमी असेल तर राजीनामा द्या, डिपॉझिट जप्त करु; तानाजी सावंतांना इशारा

धाराशिव : शिवसेना (ShivSena) प्रमुखांच्या आर्शीवादामुळे तानाजी सावंत (Tanaji Sawant) निवडून आले. खरंच सावंतांना खुमखूमी असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यायचा आणि परत निवडणुकीला उभा राहायचं. डिपॉझिट नाही गेलं तर ज्ञानेश्वर पाटील (Dnyaneshwar Patil) नाव लावणार नाही, असा इशारा ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर आमदार तानाजी सावंत यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील मात्र ठाकरे गटासोबत राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी परांडा येथे ऊस दरासाठी ज्ञानेश्वर पाटील यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी तानाजी सावंत आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले होते. तेव्हापासून सावंत-पाटील वाद पेटला आहे.

कपड्यांवर पडलेले रंगाचे डाग होतील दुर, जाणून घ्या हे उपाय

ज्ञानेश्वर पाटील पुढं म्हणाले, ज्या माणसाने तुम्हाला निवडून आणलं, ह्या तुम्हाला उभा केलं, सामान्य माणसं समजून सांगितले. या तालुक्यातील सर्व लोकांचा विरोध पत्कारला. फिरु देत नव्हते. हे सर्व असं असताना तुम्ही असे वागले? ही कोणती नितिमत्ता आहे? असा सवाल ज्ञानेश्वर पाटील यांनी तानाजी सावंत यांना केला आहे.

‘खरंच खुमखूमी असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या. या मैदानात तुमची पाठ थोपटतो. त्यांनी मला डिवचलेलं आहे त्यामुळे इथून पुढे भ्यायचं कारण नाही’, असे आव्हान ज्ञानेश्वर पाटील यांनी दिले आहे.

‘भैरवनाथ कारखाना कसा उभारला? कोणाच्या जमिनी घेतल्या? या तालुक्यात काय केलंय तिथं? हे कालांतराने दाखवून देणार आहे. त्यांनी मला डिवचलं आहे त्यामुळे त्यांना सोडणार नाही. मला उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून आमदारकी मिळालेली आहे. आता माझं काम आहे की आलेलं पार्सल कसं परत जाईल?’ असा इशारा ज्ञानेश्वर पाटील यांनी दिला आहे.

follow us