नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करा; मुख्यमंत्र्यांचे निर्दश

नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करा; मुख्यमंत्र्यांचे निर्दश

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून तापमानात मोठे बदल होत आहेत. काल रात्री राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाला (Unseasonal rain) सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. रब्बीच्या पिकांची (Rabi crops) भुईसपाट झाल्यानं पिकांची चांगलीच नासाडी झाली आहे. काढणीला आलेले पिकासह मोसंबी, डाळीब, द्राक्ष फळ बागा गळून पडल्या आहेत. त्यामुळे पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा हताश झाला आहे. दरम्यान, सरकारने तात्काळ नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे (Panchnama of damaged crops) करण्याचे आदेश देऊन भरघोस मदत करावी, अशी मागणी बळीराजा करत आहे. अशातच आता राज्यात अवकाळी पावसानं केलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी घेतली.

राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अशातच काल रात्री अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळँपिकांना मोठा फटका बसला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याचंही बघायला मिळालं. या गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. खरीप हंगामात चांगले उत्‍पन्‍न मिळाले नाही. जे मिळाले त्‍याला चांगला दर मिळाला नाही. अशातच आता रब्‍बी हंगामात अवकाळी पावसानं शेतकऱ्याचे मोठे नुकसान केल्यानं बळीराजाच्या अडचणीत मोठाी वाढ झाली. या अवकाळी पावसाचा फटका कांदा, गहू आणि हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच पिकावर रोग पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा औषध-फवारणीचा खर्चातही वाढ होणार आहे. एकीकडं कांद्यासह भाजीपाल्याला भाव नाही, दुसरीकडे पुन्हा अस्मानी संकट आल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच जिल्हाधिकारी यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे निर्देश मुख्यंमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. आज सकाळी सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीच माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त भागातील पिकाचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे, यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश दिल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

सरकारच्या धोरणांचा अनोखा निषेध; थेट गावच काढलं विकायला

दरम्यान, सरकारने आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून सरकार बळीराजाला काय मदत करते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube