नांदेड : माझ्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जात आहे. सदर व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करतायत. माझ्यावर पाळत ठेवली जातेय, अशोक चव्हाण कुठं चाललेत? कोणाला भेटतात? आणि चर्चा तर अशी करतात की याचा मेटे (Vinayak Mete) करा, याला मेटे सारखं करुन टाका, असा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला आहे.
माझ्या नावाचे बनावट लेटरहेड तयार करण्यात आलं होतं. मधला मजकूर काढून टाकण्यात आला होता. खाली सही कायम ठेवली आणि मधल्या रिकाम्या जागेत मराठा समाजात संभ्रम तयार होईल, असा मजकूर लिहिला होता. अशोक चव्हाण हे मराठा समाजाच्या विरोधात आहेत हे दाखवण्यासाठी बोगस पत्र तयार करुन फिरवण्याचा प्रयत्न होता, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.
Sushma Andhare : BJP स्वायत्त यंत्रणेला हाताशी धरून लोकशाही धोक्यात आणू पाहते
पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली आहे. बोगस लेटरहेड तयार करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. या मागचा सुत्रधार कोण आहे हे शोधून काढा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून, अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून व मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. याची आपल्याला आधीच कुणकुण लागली असल्याचं चव्हाण म्हणाले.
तर फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेडही त्यांना मिळाले होते. त्यामुळे त्यांनी यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानुसार पोलिसांकडून याची चौकशी देखील सुरु असल्याच चव्हाण म्हणाले.