Sushma Andhare : BJP स्वायत्त यंत्रणेला हाताशी धरून लोकशाही धोक्यात आणू पाहते

  • Written By: Published:
Sushma Andhare : BJP स्वायत्त यंत्रणेला हाताशी धरून लोकशाही धोक्यात आणू पाहते

अमरावती : निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे (Thackeray v. Shinde) गटात सुरु असलेल्या संघर्षात हा शिंदे गटाला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) या निकालानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे यांना शिवसेना नाव मिळाल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. आता सुषमा अंधारे यांनीही (Sushma Andhare) या निकालासंदर्भात भाष्य केलं आहे.

निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा ज्याची संसदीय लोकशाहीला धक्का देणारा आहे. भारतीय जनता पार्टी स्वायत्त यंत्रणेला हाताशी धरून संसदीय लोकशाही धोक्यात आणू पाहते, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्या म्हणाल्या, आता शिवसेनेसोबत घडले, ते उद्या कोणत्याही पक्षासोबत घडू शकते.

निवडणूक आयोगाला त्यांचाच बाजूने निर्णय द्यायचा होता, तर मग आम्हाला शपथपत्र, सदस्य नोंदणी पत्र का मागितले? आयोगाने मागितलेल्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता आम्ही केली. मात्र, आयोगाने निकाल देतांना कुठलेही निकष न लावता आपला निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाचा निकाल आयोग्य आहे. घटनाक्रम जो घडला आहे. त्यानुसार निकाल अपेक्षित आहे. परंतु, निकषांना बगल देऊन शिवसेना कशी अडचणीत येईल याचा प्रयत्न झाला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये अशी आमची मागणी होती. मात्र, निवडणूक आगोगावर दबाव असल्याने त्यांनी आपला निकाल दिला, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगावरही ताशेरे ओढले.

राज्यपालांनी 12 आमदारांची नावं लटकून का ठेवली? नेमकं कारण आलं समोर…

दरम्यान, यावेळी बोलतांना अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, स्वत:ला भूक लागल्यावर अन्न मिळवणं हा अधिकार आहे. मात्र, स्वतःचं पोटभर जेवण झाल्यानंतर दुसऱ्याच्या ताटात मूठभर माती कालवणं, हा अधिकार नाही तर ही विकृत बुद्धी आहे. आता ही विकृत बुद्धी शिंदेंना सुचत आहे, अशी टीका त्यांनी केली.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube