Download App

जीपचालक ते आमदार! कट्टर शिवसैनिक ज्ञानेश्वर पाटील काळाच्या पडद्याआड

भूम-परांडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन. पुण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Dnyaneshwar Patil Passed Away : धाराशिव जिल्ह्यातील भूम-परांडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांंचं निधन झालं. फुप्फुसात इन्फेक्शन झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी रात्री उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक अशी पाटील यांची ओळख होती. शिवसेनेत दोन गट पडले त्यावेळीही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला होता.

मोठी बातमी : छ.संभाजीनगर अन् धाराशिव नावं तशीचं राहणार; हस्तक्षेपास ‘सुप्रीम’ नकार

आगामी विधानसभा निवडणुकीत ज्ञानेश्वर पाटील उमेदवारी करणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू होती. मात्र मागील काही दिवसांपासून पाटील आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीच्या काळात ज्ञानेश्वर पाटील यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे त्यांना प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या जीपवर काम करावं लागलं.  या जीपवर ते ड्रायव्हर म्हणून काम करत होते.

याच काळात मराठवाड्यात शिवसेना विस्तारत होती. त्यामुळे पाटीलही शिवसेनेत काम करू लागले. संघटनेत हळूहळू त्यांना जबाबदारी मिळत गेली. विविध पदे भूषवित असताना त्यांना 1995 आणि 1999 या दोन निवडणुकांत मतदारांनी त्यांना निवडून देत विधानसभेत काम करण्याची संधी दिली. याआधी ज्ञानेश्वर पाटील नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात मतदारसंघात शोककळा पसरली आहे.

धाराशिव, रत्नागिरी अन् परभणी, आता ‘पालघर’ची बारी; भाजपाचा प्लॅन शिंदेसेनेला ‘डोईजड’

 

follow us