धाराशिव, रत्नागिरी अन् परभणी, आता ‘पालघर’ची बारी; भाजपाचा प्लॅन शिंदेसेनेला ‘डोईजड’

धाराशिव, रत्नागिरी अन् परभणी, आता ‘पालघर’ची बारी; भाजपाचा प्लॅन शिंदेसेनेला ‘डोईजड’

Palghar Lok Sabha Election : महायुतीच्या जागावाटपात सर्वाधिक फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेला बसला आहे. जागावाटपाच्या चर्चात भाजपने बाजी मारत शिंदे गटाच्या हक्काचे काही मतदारसंघ आपल्याकडे खेचून (Palghar Lok Sabha Election) घेतले आहेत. शिवसेनेने आतापर्यंत धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, अमरावती आणि परभणी हे चार मतदारसंघ सोडले आहेत. यातील एक मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाट्याला गेला आहे. दोन भाजपाच्या तर एक जागा राष्ट्रवादीला गेली आहे. आता आणखी एका मतदारसंघातून धनुष्यबाण गायब होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

पालघर मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. येथे राजेंद्र गावित विद्यमान खासदार आहेत. परंतु, ही जागा बहुजन विकास आघाडीला देण्यााची चाचपणी केली जात आहे. बविआला जागा देऊन त्यांच्या उमेदवाराला कमळ चिन्हावर उभे करायचे अशी प्लॅनिंग सुरू असल्याची माहिती आहे.

Madha Loksabha : देवेंद्र फडणवीसांना पुन्हा धक्का! आणखी एक धनगर नेता शरद पवारांच्या गोटात…

मनोरमधील एका रिसॉर्टमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक झाली. या बैठकीसाठी पालघर जिल्ह्यातील चार विधानसभांचे केंद्रप्रमुख, बुथप्रमुख उपस्थित होते. मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे. त्यामुळे सर्वांनी प्रयत्न करा. महायुती जो उमेदवार देईल त्याला निवडून आणा. बविआचा पर्याय उपलब्ध झाल्यास चांगलच आहे, असे चव्हाण म्हणाले. चव्हाण यांच्या या वक्तव्यावरून भाजपाचं काय प्लॅनिंग सुरू आहे याचा अंदाज येतो.

भाजप पालघरसाठी करणार जुनी खेळी

पालघरमध्ये सध्या राजेंद्र गावित खासदार आहेत. 2014 मध्ये या जागेवर भारतीय जनता पार्टीचे चिंतामण वनगा विजयी झाले होते. मात्र 2018 मध्ये त्यांचे निधन झाले. यानंतर येथे पोटनिवडणूक घेण्यात आली. यावेळी भाजपने राजेंद्र गावित यांना तिकीट दिले. ते विजयी झाले. पुढे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. परंतु, त्यांच्याकडे उमेदवार नव्हता. अशावेळी राजेंद्र गावितांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. याहीवेळी गावित विजयी झाले.

आता याच पद्धतीने भाजप बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पक्षात घेऊन भाजपाच्या चिन्हावर निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने भाजप नेत्यांकडून चाचपणी सुरू आहे. परंतु, यामध्ये सर्वात मोठी अडचण शिवसेनेची आहे. हाही मतदारसंघ गेला तर सीएम शिंदेंवर मोठी नामुष्की येईल. आधीच चार हक्काच्या मतदारसंघांतून धनुष्यबाण गायब झाला आहे. त्यानंतर आणखी एक मतदारसंघाचा त्याग करणं शिवसेनेला परवडणारं नाही. त्यामुळे आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube