Madha Loksabha : देवेंद्र फडणवीसांना पुन्हा धक्का! आणखी एक धनगर नेता शरद पवारांच्या गोटात…
Sandip Kshirsagar News : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वारं वाहत असतानाच वातावरण तापल्याचं चित्र आहे. या पक्षातून त्या पक्षात अनेकांचा पक्ष प्रवेश सुरु आहे. अशातच आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) हाती आणखी एक धनगर नेता लागल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना धक्का बसला आहे. मोहोळ भाजपचे नेते संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जात होते.
एनएलसी इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 1 लाख रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज ?
मोहोळमध्ये भाजपच्या विचारांचा एक कट्टर कार्यकर्ता म्हणून क्षीरसागर यांची ओळख आहे. भाजपच्या जडणघडणीत त्यांचं मोठा सहभाग राहिला आहे. संजय क्षीरसागर यांनी 2014 साली भाजपच्या तिकीटावरुन मोहोळ विधानसभा लढवली मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यांना 54 हजार मते मिळाली होती. तरीही देखील मला अपमानास्पद वागणूक दिली असल्याचा आरोप करत संजय क्षीरसागर यांना प्रवेशादरम्यान अश्रू अनावर झाले आहेत.
हनुमान जयंतीला पोलिसांचाही जल्लोष! समाजवादी जन परिषदेने घेतली हरकत, कारवाईची मागणी
सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील अगदी जवळचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारीही देण्यात आली होती. मात्र निवडणुकीत त्यांना 54 हजारच मते मिळाली होती. याआधी उत्तम जानकर यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. आता संजय क्षीरसागर यांच्या रुपात त्यांना दुसरा धनगर नेता मिळाला आहे. त्यामुळे सोलापुरात शरद पवार यांची चांगलीच ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्याकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर मैदानात उतरले आहेत. आधी उत्तम जानकर आता संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने सोलापुरात शरद पवार गटाची मोठी ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे. या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांच्या प्रवेशामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.