Download App

गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी; अब्दुल सत्तार म्हणाले, लाठीचार्ज करा, इतकं मारा की…

Abdul Sattar : वादग्रस्त वक्तव्य करून नेहमीच स्वतःची आणि सरकारची कोंडी करणारे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून विरोधकांच्या हातात कोलित दिलं आहे. मंत्री सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आता गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटल्यानंतर लोकांची प्रचंड गर्दीही झाली. मात्र, कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी हुल्लडबाजी केली. हा प्रकार पाहून मंत्री सत्तार चांगलेच संतापले. संतापाच्या भरात पोलिसांना लाठीचार्जचे आदेश दिले. कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबर मोडा. एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे, असे शब्द सत्तार यांच्या तोंडून बाहेर पडले. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अब्दुल सत्तार वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे.

Abdul Sattar : निवडणुकांच्या तोंडावर अल्पसंख्याकांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय; सत्तारांनी मानले आभार

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गौतमी पाटीलचाही कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी तरुणांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मात्र गर्दीतील काही जण गोंधळ घालू लागले. त्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला. तरुणांची हुल्लडबाजी कमी होत नव्हती. त्यामुळे अब्दुल सत्तार स्वतः माईक घेऊन स्टेजवर पोहोचले.  तरुणांना शांत राहण्याचे आवाहन केले. पण, गोंधळ काही शांत झाला नाही. मग सत्तारही चिडले. त्यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना थेट लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले.

सत्तार एवढ्यावरच थांबले नाही तर गोंधळ घालणाऱ्या लोकांना मारा अशा सूचना पोलिसांना देत होते. गोंधळ घालणाऱ्यांना कुत्र्यासारखं मारा. येथे एक हजार पोलीस आहेत. 50 हजार लोकांना मारायला काय लागतं. या लोकांना मारल्यानंतर जेलमध्ये टाका, असंही सत्तार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

Abdul Sattar : कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाची हेळसांड! विहीर मिळाल्या, पण ६ वर्षांपासून विजेपासून वंचित

महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा – वडेट्टीवार 

सत्तार यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते यांनी जोरदार टीका केली. मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला. हजारोंच्या गर्दीसमोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढण्याची भाषा वापरतात. महाराष्ट्र पोलीस दलातील जवानांना हे महायुतीतील मंत्री स्वतःच्या टोळीतील गुंड समजतात का?, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

follow us