Download App

Ghati Hospital: रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचं काम बंद आंदोलन

छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासी डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयात डॉक्टरांंनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे.

  • Written By: Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट आहे. (Chhatrapati Sambhajinagar )  ही घटना घडल्यानंतर आता निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे.

येथील वार्ड क्रमांक 19 मध्ये एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर आवश्यक ते उपचार करीत होते. मात्र, या रुग्णाच्या उपचाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचं म्हणत नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला आहे. या मारहाणीत संबंधित निवासी डॉक्टर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तसंच, मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मराठवाडा अन् विदर्भासाठी आनंदाची बातमी! छत्रपती संभाजीनगर ते नागपूर विमानसेवा लवकरच सुरू

ज्यांनी मारहाण केली त्यांना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी कामबंद आंदोलन करीत असल्याचं मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. रोहन गायकवाड यांनी सांगितलं आहे. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी घाटीत धाव घेऊन निवासी डॉक्टरांशी संवाद साधला. दरम्यान, हल्ला करणाऱ्यास अटक होईपर्यंत रुग्णसेवा देणार नाही, केवळ आयसीयूमध्ये रुग्णसेवा चालू असेल असा पवित्रा आंदोलक डॉक्टरांनी घेतला आहे.

निवासी डॉक्टरांच्या काय आहेत मागण्या

सर्व निवासी डॉक्टर अपघात विभागसमोर एकत्र आले. अपघात विभागात रुग्णसेवा देणार नसल्याचा पवित्रा निवासी डॉक्टरांनी घेतला. निवासी डॉक्टरांसोबत त्यांनी चर्चा केली. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणे, याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करणे आदी मागणी निवासी डॉक्टरांनी अधिष्ठातांकडे केल्या आहेत. याबाबत अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे यांनी देखील सकारात्मक आश्वासन दिले आहे.

follow us