CM केजरीवालांचे कॉल रेकॉर्ड तपासा; महिला आयोगाने तीन दिवसांत अहवाल मागितला

CM केजरीवालांचे कॉल रेकॉर्ड तपासा; महिला आयोगाने तीन दिवसांत अहवाल मागितला

Swati Maliwal Case : आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal Case) मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलायं. या प्रकरणातील संबंधित व्यक्तीचे सर्वच कॉल रेकॉर्ड तपासण्याचे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाकडून (NSW) दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांच्यासह इतरांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याचे आदेश राष्ट्रीय महिला आयोग (NCW) ने दिले आहेत. या प्रकरणासह सुश्री मालीवाल बलात्कार अन् धमकी प्रकरणातील अहवाल पुढील तीन दिवसांत सादर करण्याचंही महिला आयोगाने सांगितलं आहे.

महिला आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, आम्हाला माहिती मिळाली आहे की, स्वाती मालीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांना तेथे बोलावण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधित व्यक्तींचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासणे आवश्यक आहे. बिभव कुमार यांना कोणाच्या सांगण्यावरुन बोलावण्यात आले हे समजण्यासाठी कॉल डिटेल्स तपासणे आवश्यक आहे. तसेच स्वाती मालीवाल यांना धमकी देणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आयोगाने केलीयं.

आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांनी खासदार स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर याबाबत राजकीय वर्तुळात मोठा संताप व्यक्त करण्यात आला.

ससूनमधील डॉक्टरला कोणी मॅनेज केले? आमदार सुनील टिंगरे यांचीही चौकशी होण्याची शक्यता

नेमकं प्रकरण काय?
आपच्याच खासदार असलेल्या स्वाती मालीवाल यांच्या नावे आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास दिल्ली पोलिसांना एक फोन आला. त्यावर मालीवाल बोलत असल्याचं समोरच्या व्यक्तीने सांगितलं. तसेच सांगण्यात आलं की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी केजरीवालांच्याच सांगण्यावरून त्यांच्या पीएने आपल्याला मारहाण केली. बिभव कुमार असं या पीएचं नाव आहे. दिल्ली पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली. मात्र ही फोन करणारी व्यक्ती खरंच स्वाती मालीवाल होत्या का? याचा तपास सध्या दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी याबाबत मालीवाल यांची भेट घेतली असता. त्यांनी मारहाण झाल्याचं सांगितलं.

दरम्यान, सुश्री मालीवाल प्रकरणी संबंधित धमकी देणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबतही राष्ट्रीय महिला आयोगाकडून निर्देश देण्यात आले असून या आरोपींवर आयपीसी 1860 नूसार कलम लावण्यात यावेत. यासंदर्भातील अहवाल पुढील तीन दिवसांत सादर करण्याचंही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube