अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळणार? सर्वोच्च न्यायालय आज देणार निकाल

अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळणार? सर्वोच्च न्यायालय आज देणार निकाल

Arvind Kejriwal News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे एका महिन्याहून अधिक काळ तिहार तुरुंगात आहेत. त्यांना जामीन मिळणार की नाही, यावर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) केजरीवाल यांना अटक केली होती. या अटकेला केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान दिलं होतं.

माझ्यावर अत्याचार झालाच नाही, तक्रार खोटी; संदेसखली प्रकरणातील महिलेचा जबाब 

ट्रायल कोर्ट आणि दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने केजरीवाल यांनी ईडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच जामीनासाठी अर्ज केला होता. प्रचारसभा घेण्यासाठी आपल्याला अंतरिम जामीन मिळावा, असी मागणी करणारा अर्ज त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर केजरीवाल यांच्या जामिनावर सुनावणी झाली.

आनंदाची बातमी! येत्या 24 तासात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पावसाच्या सरी 

त्यावेळी शुक्रवारी निकाल जाहीर केला जाईल, असे खंडपीठाने सांगितले होते. तत्पूर्वी ईडीने गुरूवारी प्रतिज्ञापत्र दाखल करून अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास जोरदार विरोध केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन देणे योग्य होणार नाही, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात युक्तिवाद केला होता. निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन देणे हा घटनात्मक किंवा मूलभूत अधिकार किंवा कायदेशीर अधिकार नसल्याचं मेहता यांनी सांगितलं होतं. तसेच अरविंद केजरीवाल निवडणूकही लढवत नसल्याचे तपास यंत्रणेने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

तर दुसरीकडे, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कायदेशीर पथकाने सुनावणी पूर्ण झाल्यानंतर शपथपत्र दाखल करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे, त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. केजरीवाल यांना जामिन न मिळाल्यास त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते.

केजरीवालांना कोणत्या प्रकरणात अटक?
आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर दिल्ली दारू धोरणाद्वारे काही लोकांना फायदा मिळवून देण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या नावांचा समावेश आहे. याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube