माझ्यावर अत्याचार झालाच नाही, तक्रार खोटी; संदेसखली प्रकरणातील महिलेचा जबाब

माझ्यावर अत्याचार झालाच नाही, तक्रार खोटी; संदेसखली प्रकरणातील महिलेचा जबाब

Sandeshkhali Rape case : संदेशखली (Sandeshkhali) प्रकरणात मोठा यू टर्न आला आहे. या अत्याचार प्रकरणातील एका महिलेने बुधवारी तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) नेत्यावरील लैंगिक छळाचे आरोप मागे घेतले. माझ्यावर बलात्कार झालच नाही, भाजप (BJP) नेत्यांनी कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेऊन जबरदस्तीने गुन्हा दाखल केला, असा खळबळजनक दावा महिलेने केला.

आनंदाची बातमी! येत्या 24 तासात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पावसाच्या सरी 

संदेशखली प्रकरणात तीन महिलांनी टीएमसी नेते शेख शाहजहानवर बलात्कार केल्याचा आणि त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. मात्र आता त्या तीनपैकी एका महिलेने केस मागे घेतली आहे. लैंगिक अत्याचार झाल्याचे नाकारत भाजप नेत्यांवर जबरदस्तीने सह्या घेतल्याचा आरोप करणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर तृणमूल काँग्रेसने भाजपवर खोटारडेपणा आणि कारस्थान रचल्याचा आरोप करत आक्रमक पवित्रा घेतला. या संदर्भात तृणमूलच्या खासदार सागरिका घोष यांनी दिल्लीतील निवडणूक आयोगात भाजपविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीच्या सोनेरी साडीतील मोहक अदा 

कोऱ्या कागदावर सही करून बलात्काराची तक्रार दाखल करण्यासाठी भाजपने दबाव आणल्याचे महिलेने सांगितले. आता हे खोटे आरोप मागे घेतल्याबद्दल तिला धमक्या आणि सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात महिलेने संदेशखली पोलिस ठाण्यात नवीन फिर्याद दिली आहे.

कोऱ्या कागदांवर सह्या करून आमची फसवणूक झाली. आमच्यावर बलात्काराची तक्रार दाखल झाल्याचे आम्हाला नंतर कळले. भाजप नेत्या पियाली दास यांच्या कारस्थानाचे आम्ही बळी ठरलो आहोत. स्थानिक भाजप महिला मोर्चाचे पदाधिकारी आणि पक्षाचे इतर सदस्य माझ्या घरी आले. माझे नाव गृहनिर्माण स्कीममध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांनी माझी स्वाक्षरी मागितली. त्यानंतर ते मला पोलिस ठाण्यात घेऊन गेले, जिथे मला बलात्काराची तक्रार दाखल करण्यास सांगण्यात आले. पण तृणमूल कार्यालयात माझा लैंगिक छळ झाला नसल्याचं महिलेनं सांगितलं.

दरम्यान, महिलेच्या या जबाबमुळं निवडणूकपूर्व वातावरण तापणाऱ्या भाजपचे आणखी एक कट कारस्थान यामुळं उघडीस आलं.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

मुख्य आरोपी शेख शहाजहान याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख शाहजहानने अनेक महिलांचे शोषण करून त्यांच्या जमिनीही हडप केल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी एसआयटीही स्थापन करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज