आनंदाची बातमी! येत्या 24 तासात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पावसाच्या सरी

आनंदाची बातमी! येत्या 24 तासात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पावसाच्या सरी

Pre-Monsoon Rain : दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या २४ तासांत महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस (Pre-Monsoon Rain) आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारपासून (दि. 11) मध्य महाराष्ट्र, घाट आणि दक्षिण कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची (Weather Forecast) शक्यता आहे.

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीच्या सोनेरी साडीतील मोहक अदा 

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, या आठवड्याच्या शेवटी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका पाऊस किंवा मध्यम पाऊस पडेल. तर 10 मे पासून धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर आणि मुंबईच्या आसपासच्या इतर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीच्या कामाला गती द्यावी, असं आवाहनही करण्यात आला.

मी नकली असेल, तर तुम्ही बेअकली! पंतप्रधानांच्या टीकेवर ठाकरेंचा प्रहार 

पुढील २४ तासांत मान्सूनपूर्व पाऊस
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारपासून मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये अनेक भागात पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील. मुंबईच्या पूर्वेला बदलापूर, कर्जत, कल्याण-डोंबिवली, पनवेल आदी भागात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

कोठे कोसळणार पाऊस?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर येथे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली येथे पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IMD च्या अंदाजानुसार 11 मे रोजी अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज