अरविंद केजरीवाल तिहारमध्येच!, न्यायालयीन कोठडी वाढली
Arvind Kejriwal Money Laundering Case : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना पुन्हा एकदा मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) झटका बसला आहे. या प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Korta) अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मे पर्यंत वाढ केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 मे रोजी होणार आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह बीआरएस (BRS) नेते के. कविता (K. Kavitha) यांना देखील या प्रकरणात 7 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बीआरएस नेते के. कविता यांच्यासह दिल्ली दारू धोरणाशी (Delhi Liquor Policy) संबंधित प्रकरणात आरोपी चनप्रीत सिंगच्या देखील न्यायालयीन कोठडीतही 7 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज सीबीआयने तिघांनाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले होते.
‘मी फाउंडर सदस्य, अजितदादांनाही पक्षातून काढू शकतो’; उत्तम जानकरांची फटकेबाजी
केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक झाली होती
दिल्ली दारू धोरणाशी संबंधित प्रकरणात ईडीने तब्बल 2 तासांच्या चौकशीनंतर 21 मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. या प्रकरणात न्यायालयाकडून 15 एप्रिल रोजी सुनावणी करण्यात आली होती मात्र ईडीचा प्रतिसाद येईपर्यंत न्यायालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांना तात्काळ दिलासा देण्यास नाकार दिला होता.
नाथाभाऊंच्या भाजपवापसीला ब्रेक! राज्यातील नेत्यांचा दिल्लीत डाव अन् रखडला पक्षप्रवेश
या प्रकरणात पुढील सुनावणी आता 7 मे रोजी होणार आहे. या सुनावणीत केजरीवाल यांना न्यायालयाकडून दिलासा मिळणार का हे पाहावे लागणार आहे.