मोठी बातमी! दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैनविरोधात दाखल होणार मनी लाँड्रिंगचा गुन्हा, राष्ट्रपतींनी दिली परवानगी

Satyendra Jain Money Laundering Case : दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) नेते सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांच्या अडचणी वाढणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी त्यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग (Money Laundering) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. माहितीनुसार, याबाबत गृह मंत्रालयाने 14 फेब्रुवारी राष्ट्रपतींना यासाठी विनंती केली होती.
Union Ministry of Home Affairs has requested the President to grant prosecution sanction for initiating legal proceedings against Satyendra Kumar Jain, AAP leader and former minister of the Delhi government, under Section 218 of the Bharatiya Nagrik Suraksha Sanhita, 2023. Based…
— ANI (@ANI) February 14, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे, सत्येंद्र कुमार जैन यांच्याविरुद्ध या प्रकरणात खटला चालवण्यास मान्यता देण्यासाठी पुरेसे पुरावे आढळले आहेत, म्हणून न्यायालयात खटला चालवण्याची मागणी गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींकडे केली होती. तर काही दिवसांपुर्वी हवाला व्यवसायाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तपास यंत्रणांनी सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता आणि मे 2022 मध्ये त्यांना अटकही करण्यात आली होती, सत्येंद्र जैन सध्या जामिनावर आहेत, ईडीने आप नेत्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
सत्येंद्र जैन यांना ईडीने जेव्हा ताब्यात घेतले होते तेव्हा ते दिल्ली सरकारमध्ये आरोग्य, वीज यासारखी मंत्रालये सांभाळत होते. मनी लाँड्रिंगचा हा खटला सीबीआयने ऑगस्ट 2017 मध्ये जैन आणि इतर काही आरोपींविरुद्ध उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याच्या आरोपाखाली दाखल केला होता.
Champions Trophy 2025 भारताच्या अडचणी वाढणार? न्यूझीलंडच्या संघात ‘या’ स्टार खेळाडूची एंट्री
सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते ज्यामध्ये असे म्हटले होते की कथित मालमत्ता 1.47 कोटी रुपयांची होती जी 2015-17 दरम्यान जैन यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जवळपास 217 टक्के जास्त होती.