मोठी बातमी : भारतीय संघाचा माजी कर्णधार ED च्या रडारवर; मनी लाँड्रिंग प्रकरणात धाडलं समन्स
Mohammad Azharuddin gets ED summons in Hyderabad cricket body corruption case : क्रिकेट विश्वातन एक मोठी बातमी समोर येत असून, भारतीय संघाचा माजी कर्णधाराला मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने (ED) समन्स बजावले आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनशी संबंधित हे समन्स भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि काँग्रेसचे नेते मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. अझरुद्दीनवर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये 20 कोटी रुपयांच्या निधीची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप आहे. अझरुद्दीनला आज ईडीसमोर हजर व्हावे लागणार होते. मात्र, अझरुद्दीनने ईडीसमोर हजर राहण्यासाठी अधिकचा वेळ मागितला आहे.
एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह, २४ तास हेल्पलाईन, महिला सुरक्षेसाठी पंचशक्ती; अजितदादांची माहिती
ईडीने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता अझरुद्दीनला ईडीने समन्स पाठवले असून, ईडीने तेलंगणातील 9 ठिकाणी छापे टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.
आयटम सॉंगमुळे लहान मुलं मॅच्यूअर होतात का? मानसशास्त्रज्ञांनी शेअर केला अनुभव
स्टेडियम बांधकामात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप
अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या म्हणण्यानुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामात आर्थिक अनियमितता केली आहे. असोसिएशनने खासगी कंपन्यांना चढ्या दराने कंत्राटे देऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी ईडीने तीन एफआयआर नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे.
Enforcement Directorate has summoned former Cricketer and Congress leader Mohammed Azharuddin in an alleged money laundering case linked to Hyderabad Cricket Association: Sources
(File photo) pic.twitter.com/oX9Tvs4Wc9
— ANI (@ANI) October 3, 2024
क्रिकेटपटू ते राजकारणी झालेला अझरुद्दीन २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर मुरादाबाद, यूपी येथून खासदार झाले होते. अझरुद्दीनने 2014 ची लोकसभा निवडणूक राजस्थानमधून लढवली होती पण येथे अझरुद्दीनलापराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर 2018 मध्ये अझरुद्दीनची तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
मोठी बातमी : कैद्यांना जातीवर आधारित कामाचे वाटप बंद करा; सु्प्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
मजबूत फलंदाज आणि यशस्वी कर्णधार, अशी त्यांची कारकीर्द होती
मोहम्मद अझरुद्दीनची टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणना होते. मात्र, मॅच फिक्सिंगमध्ये नाव आल्यानंतर 2000 साली अझरुद्दीनची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली. अझरुद्दीनने भारतासाठी 99 कसोटी आणि 334 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. अझहरने 99 कसोटी सामन्यांमध्ये 45.03 च्या सरासरीने 6215 धावा केल्या आहेत. ज्यात 22 शतके आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 9378 धावा केल्या आहेत ज्यात 7 शतके आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे.