Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकादा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण दिले तरी देखील ते कोर्टात टीकत नाही. यासाठी ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली जात होती पण राज्यातील ओबीसी नेत्यांचा विरोध असल्याचे बोलले जात होते. पण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाचा मार्ग सांगितला आहे. जालन्यात सुरु असलेल्या उपोषणस्थळी जाऊन विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमची हरकत नाही. पण जे काही आरक्षण असेल तेवढं वाढवलंच पाहिजे. नाहीतर तुमच्या आणि आमच्या वाट्याला काहीच मिळणार नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
केंद्रात नरेंद्र मोदींच बहुमताचं सरकार आहे. त्यांनी विधेयक आणावं. 10-12 टक्के आरक्षण वाढवून द्यावं. आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)ला एका झटक्यात आरक्षण वाढवलं. त्यामुळे मराठा समाजालाही देऊन टाका. 50 टक्क्यांच्या वर मर्यादा गेलीच आहे. हीच माझी भूमिका आहे, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.
माझा आधी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध होता पण आता मी माझी भूमिका बदलली आहे. माझा उपोषणाला पाठिंबा, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
IND Vs NEP: पावसामुळे भारत-नेपाळ सामना रद्द झाला तर काय होईल?
आरक्षणाच्या टक्केवारीमध्ये आणखी वाढ करा
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यायचे असेल तर ओबीसींच्या आरक्षणाच्या टक्केवारीमध्ये आणखी 12 ते 15 टक्क्यांनी वाढ करावी. ओबीसींची लोकसंख्या 52 टक्क्यांहून अधिक आहे आणि त्यांनी मिळणारे आरक्षण केवळ 27 टक्के आहे. त्यामुळे ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली होती.