Download App

सारंगीताईच्या संमतीनेच व्यवहार, आरोप बिनबुडाचे; गोविंद मुंडेंचा खुलासा

Govind Munde On Sarangi Mahajan : सारंगीताई महाजन (Sarangi Mahajan) यांच्या जमिनीचा व्यवहार दोन वर्षांपूर्वी त्यांच्या संमतीने व रजिस्त्री ऑफिसमध्ये झाला असल्याचा मोठा खुलासा गोविंद मुंडे (Govind Munde) यांनी केलायं. यांसदर्भातील व्हिडिओ मुंडे यांनी प्रसारित केलायं. दरम्यान, गोविंद मुंडे यांनी धाक दाखवून आम्हाला रजिस्ट्री लावून घेतली. जोपर्यंत सह्या केल्या नाही, तोपर्यंत सोडलं नसल्याचा आरोप प्रविण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला होता. त्यानंतर गोविंद मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय.

अमोल मिटकरींना बडी मुन्नी बोलायला लावतेय, त्या मुन्नीची सुन्नी करतो; धसांनी सांगितला बोलवता धनी

गोविंद मुंडे म्हणाले, सारंगी महाजन यांच्या जमीन खरेदीचा व्यवहार हा पूर्णपणे त्यांच्या संमतीने झालेला असून, खरेदीखत रजिस्ट्री ही रजिस्ट्री ऑफिसमध्ये झालेली आहे. त्यांना व्यवहारात ठरलेली संपूर्ण रक्कम देखील दिलेली आहे. सारंगीताई या सुशिक्षित असून कुठल्याही कोऱ्या कागदावर सह्या कशा करू शकतात? त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे व चुकीचे असल्याचं गोविंद मुंडे यांनी म्हटलंय. तसेच संबंधित व्यवहाराचे पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे तसेच रजिस्ट्री कार्यालयात देखील उपलब्ध आहे. हा व्यवहार सारंगीताई व माझ्यात झालेला असून या प्रकरणाचा मंत्री धनंजय मुंडे किंवा पंकजाताई मुंडे यांचा दुरान्वये कसलाही संबंध नसल्याचं गोविंद मुंडेंनी स्पष्ट केलंय.

रामगिरी महाराजांचं आता अती झालं; त्यांना एकदा.. राष्ट्रगीतावरील वक्तव्याने जितेंद्र आव्हाड संतापले

हा व्यवहार दोन वर्षांपूर्वी झालेला असून आता दोन महिन्यांपूर्वी सारंगी महाजन यांनी या विषयी कोर्टात दावा दाखल केला असून, त्याविरुद्ध आपण आव्हान याचिका दाखल केली असल्याचेही गोविंद मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे सदर व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आपण जेवणासह सारंगी महाजन यांचा यथोचित पाहुणचार करून त्यांना स्वतःच्या गाडीतून मुंबईला सोडवले होते असाही दावा मुंडे यांनी केलायं.

दरम्यान, सारंगी महाजन यांनी दिलेला दावा व त्याविरुद्ध मी केलेले आव्हान हे न्यायप्रविष्ट आहे. सारंगी यांनी विनाकारण या धनंजय मुंडे किंवा पंकजाताई मुंडे यांचे या व्यवहाराशी कसलाही संबंध नसताना त्यांचे नाव जोडून चुकीचे व बिनबुडाचे आरोप करू नयेत, असेही गोविंद मुंडे म्हणालेत.

सारंगी महाजनांचा दावा काय?
गोविंद मुंडे यांनी मला धाक दाखवून आम्हाला रजिस्ट्री लावून घेतली. जोपर्यंत सह्या केल्या नाही, तोपर्यंत सोडलं नाही. त्याने आमच्याकडून शंभर रूपयाच्या कोऱ्या स्टॅम्पवर देखील सह्या करून घेतल्या. जोपर्यंत सह्या करत नाही, तोवर परळी सोडू देणार नाही अशी धमकी दिली. यांचं सत्ताकारण, राजकारण लखलाभ. यामध्ये पंकजा आणि धनंजय दोघांचाही हात आहे. हे प्रकरण 6 जून 2022 ला रजिस्ट्री लावून घेतली आहे. आम्हाला एक महिन्याने इसार पावती पाठवली. त्यामध्ये जमिनीचं ट्राझंक्शन खोटं करून घेतलं असा दावा सारंगी महाजन यांनी केलायं.

follow us