Download App

सरकारी पैशांतून गर्लफ्रेंडला फ्लॅट, BMW; कंत्राटी लिपिकाचं मोठं कांड, 21 कोटींचा डल्ला

छत्रपती संभाजीनगरच्या एका सरकारी कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याने सरकारी तिजोरीतील 21 कोटी 59 लाख रुपये लंपास केल्याची घटना घडलीयं.

Chatrapati Sambhajinagar News : आपल्या प्रेयसीला महागडा प्लॅट, फ्लॅटमध्ये चीनवरुन साहित्य, स्वत:कडे बीएमडब्लू कार, आणि मित्रांनाही प्लॅट. छत्रपती संभाजीनगरच्या एका शासकीय कार्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्याने सरकारी तिजोरीवर डल्ला मारुन आपल्या प्रियसीला मित्रांना फ्लॅट आणि स्वत:साठी बीएमडब्लू कार घेतल्याचं समोर आलंय. कागदोपत्रांची अफरातफर करुन या कर्मचाऱ्याे सरकारी तिजोरीमधील तब्बल 21 कोटी 59 लाख रुपये लंपास केल्याचं घडलंय. ही घटना नेमकी काय? कंत्राटील लिपिकाने काय झोल केलायं, याबाबत सविस्तर या पाहुयात..

मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध; तब्बल अकरा वर्षांपूर्वी मोहिनी आणि अक्षय हे जवळ कसे आले?

हर्षलकुमार अनिल क्षीरसागर असं या कंत्राटी लिपिकाचं नाव आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये तो छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयात कंत्राटी लिपिक पदावर रुजू झाला. हर्षलकुमार हा संगणक ऑपरेटर होता. या पदावर काम करीत असताना त्याने विभागीय क्रीडा संकुलासह उपसंचालकांच्या कागदोपत्रांचा गैरवापर केला. तसेच बॅंकेतील खात्याच्या माहितीसाठी ई-मेल आयडी देखील बदलला. हर्षलकुमारने बदललेल्या ई-मेल खात्यावरुन बॅंकेला रिक्वेस्ट पाठवून नेट बॅंकिंगसाठी स्वत:चाच मोबाईल नंबर दिला. त्यानंतर त्याने सहा महिन्यांच्या आतच तब्बल 21 कोटी 59 लाख रुपये आपल्या खात्यावर लंपास केले.

खरी मजा आत्ताच…हिशोब चुकता करण्याची; मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांचा फडणवीसांवर वार

हर्षलकुमारने 21 कोटी रुपयांवर डल्ला मारल्यानंतर त्याने आपली प्रेयसीला एका उच्चभ्रू परिसरात फ्लॅट घेऊन दिला. एवढंच नाही तर या फ्लॅटच्या सजावटीसाठी त्याने चीनवरुन महागड्या वस्तूदेखील मागवल्या. तसेच फ्लॅटमध्ये बदल करण्यासाठी जवळपास 20 लाख रुपयांचा खर्चही केला. या फ्लॅटचं नूतनीकरणही त्याने केलं. यासोबतच स्वत:साठी त्याने महागड्या गाड्या खरेदी केल्या. तो स्वत: बीएमडब्लू कार वापरत होता. यासोबतच आपल्या मित्रालाही त्याने महागडा फ्लॅट विकत घेऊन दिल्याचं समोर आलंय. कंत्राटी लिपिकानेच सरकारी तिजोरीवर डल्ला मारल्याचं लक्षात येताच क्रीडा विभागाचे अधिकारी तुषार कुलकर्णी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी कंत्राटी लिपिक यशोदा शेट्टी, पती बी. के. जीवन यांना ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, क्रीडा विभागात हर्षलकुमारसोबत काम करणाऱ्या कंत्राटी लिपिकांची तीन तास चौकशी करून जबाब नोंदवले असून विभागातील अन्य अधिकाऱ्यांनादेखील चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. पथकाने हर्षकुमारच्या नावाने किती बँकांमध्ये खाती आहेत, याची माहिती मागवलीयं. या प्रकरणी लिपिक यशोदा शेट्टीसह पती बी.के. जीवन यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर हर्षलकुमार हा आपल्या प्रेयसीला घेऊन पसार झाल्याचं सांगण्यात येत आहे.

follow us