Hingoli Farmers Suicide News : डोक्यावर कर्जाचा भार, काळ्या मातीतून पीकं येईना, कुटुंबाच्या खळगीचा प्रश्न, या समस्यांना कंटाळून एका कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांने आपलं जीवन संपवलं. शेतकऱ्याने जगाचा निरोप घेतल्यानंतर लेकीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांना भावनिक पत्राद्वारे थेट देवाघरचा नंबर मागून बांबांना परत पाठवण्याची विनवणी केली आहे. सध्या या शेतकऱ्याच्या लेकीचं पत्र सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. खोडके यांची मुलगी इयत्ता आठवीत शिकत असून या चिमुकलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहलं आहे.
Sanjay Raut : ‘मुख्यमंत्री रोज सकाळी भाजपाची भांडी घासतात’; राऊतांची जळजळीत टीका
नारायण खोडके असं या शेतकऱ्याचं नाव असून या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यानंतरच लेक किरण खोडके हिने आईला बाबांबद्दल विचारपूस केल्यानंतर आईने बाबा देवाघरी गेल्याचं उत्तर दिलं. त्यानंतर बाबांना पाहण्यासाठी आतुर झालेल्या लेकीने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच पत्र धाडलं आहे.
Horoscope Today : आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
शेतकऱ्याच्या लेकीने पत्रात म्हटलं, “सर, तुमचा दसरा चांगला गेला, तुमची दिवाळी पण चांगली जाणार. आमच्या घरी दसरा नाही, दिवाळी नाही. आई रडत असते. सारखी म्हणते मालाला भाव असते तर तुझा बाबा मेला नसता. वावरात सोयाबीन कमी झालं. आई न बाबाचं भांडण झालं, आणि आमचा बाबा पुन्हा आला नाही.
Apoorva Movie Trailer: तारा सुतारियाचा ‘अपूर्वा’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
आजीला विचारलं तर ती म्हणते देवाघरी गेला. सर देवाचं घर कुठं आहे. त्याचा नंबर द्या आणि माझ्या बाबांना पाठवा लवकर, दिवाळी येणार आहे, आमच्या घरी दोन दीदी मी आणि दादा आहोत, रोज बाबाची वाट पाहतो, पण ते येत नाहीत. मग आम्हाला दिवाळीला बाजारात कोण नेईल, कपडे कोण घेईलं?”, असा सवाल या शेतकऱ्याच्या लेकीने केला आहे.
दरम्यान, एकीकडे राज्यात राजकीय घडामोडी सुरु आहेत, तर दुसरीकडे दुष्काळग्रस्त भागांत शेतकरी कर्जाला, पिकाला भाव मिळत नसल्याने आत्महत्या करीत आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी अजूनही राज्य सरकार मदत करेल या आशेवर जगत आहेत, मात्र, अद्याप कोणतीही ठोस मदत शेतकऱ्यांना मिळालेली दिसत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्याच्या लेकीने धाडलेल्या पत्रावर मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेतील? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.