Sanjay Raut : ‘मुख्यमंत्री रोज सकाळी भाजपाची भांडी घासतात’; राऊतांची जळजळीत टीका
Sanjay Raut Criticized Eknath Shinde : राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत चालल्या आहेत तसे ठाकरे गटाचे नेते भाजप आणि शिंदे गटावर तुटून पडले आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांच्यावर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री रोज सकाळी उठले की भाजपाची (BJP) भांडी घासायला लागतात, अशा शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केला. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघाती टीका केली.
राऊत म्हणाले, मुख्यमंत्री केवळ नावालाच शिवसेनेचे आहेत. मात्र, रोज सकाळी उठले की ते भाजपाची भांडी घासायला लागतात. यांच्या शिवसेनेला आपण बाळासाहेबांची शिवसेना म्हणूच शकत नाही. मुख्यमंत्र्यांमध्ये थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल त्यांनी मराठा आरक्षणाबाबत मोदींना (PM Modi) विचारायला हवे. शरद पवारांना काय केलं असं विचारणाऱ्या पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे होतं की मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) तुम्ही काय केल?. हा निर्णय तुमच्या हातात आहे, हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.
Sanjay Raut : तुमच्या काळातच सर्वाधिक शेतकरी आत्महत्या; राऊतांचं मोदींना प्रत्युत्तर
खरेतर शरद पवारांकडे बोट दाखवण्याऐवजी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवून मोदींनी विचारले पाहिजे होते की तुम्ही काय करत आहात. जरांगे पाटील यांना घेऊन माझ्याकडे दिल्लीला का नाही आलात, हे त्यांनी विचारायला हवे होते. आपण शिर्डीला येता साईबाबांच्या दरबारात खोटं बोलता, गुमराह करता, भंपकपणा करता आणि दुसऱ्यांकडे बोट दाखवता. मराठा आरक्षणासंदर्भात शब्द देऊनही तो पाळला नाही, अशी टीका राऊत यांनी केली. थोडा जरी स्वाभिमान असेल तर महाराष्ट्राविषयी बोला, स्वतःच्या पक्षाविषयी बोला पण रोज सकाळी उठल्यापासून ते सुरू करत आहेत मोदीं शहांचं स्त्रोत्र त्यांनी सुरू केलं आहे.
मोदींच्या काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
तुम्ही काय केलं या महाराष्ट्रात? सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या मोदींच्या काळात झाल्या. आपण काळे कायदे आणले हे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचं अपयश आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणार होतात सिंगलही झाले नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आपण लागू केल्या नाहीत आणि महाराष्ट्रात येऊन आपण शरद पवारांवर बोलायचं. उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये जाऊन बोला योगी सरकारने नेमकं काय केलं. आसाम मध्ये जाऊन बोला तेथील मुख्यमंत्र्यांनी काय केलं. देशातील शेतकरी संकटात आहे आणि याला जबाबदार नरेंद्र मोदी सरकार आहे अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.
Maratha Reservation : कुणबी दाखले प्रमाणपत्र समितीला सरकारने मुदवाढ का दिली? खरं कारण आलं समोर…