Download App

Eknath Shinde : 2024 लाही शिंदेच CM! बांगरांनी घेतला नवसाचा मोदक

Image Credit: Letsupp

Eknath Shinde : राज्यात आज सर्वत्र गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप (Ganpati Visarjan 2023) दिला जात आहे. ढोल ताशांचा गजर अन् गुलालाची मुक्त उधळण करत मोठ्या जल्लोषात मिरवणुका निघाल्या आहेत. याच दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बांगर यांनी आज हिंगोलीतील विघ्नहर्ता गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ख्याती आहे. त्यामुळे 2024 ला एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) मुख्यमंत्री व्हावेत यासाठी विघ्नहर्ता गणपतीकडे नवस केला असून यासाठीच मोदक घेतल्याचे बांगर म्हणाले.

गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर बांगर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले ज्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, 2019 ला मी मोदक घेतला आणि एका वर्षात आमदार झालो. माझा नवस पूर्ण झाला. आता देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस यांचे सरकार परत यावे यासाठी आज मी प्रार्थना केली. 2024 मध्ये एकनाथ शिंदे हेच परत मुख्यमंत्री व्हावेत यासाठी नवसाचा मोदक घेतल्याचे बांगर म्हणाले.

Deepak Kesarkar : ‘मंत्री झाल्यानंतर 25 कोटींची ऑफर’; केसरकरांच्या वक्तव्याने खळबळ !

हिंगोलीतील विघ्नहर्ता गणपती नवसाला पावतो अशी ख्याती आहे. त्यासाठीच भाविक येथे मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. मोदक घेऊन गणपतीकडे नवस मागतात. नवस पूर्ण झाल्यानंतर पुढल्या वर्षी त्या नवसाची परतफेड करण्यासाठी 1001 मोदकांचे वाटप करतात. हाच मोदक घेण्यासाठी हजारो भक्तांनी आज येथे गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

आमचे सगळेच आमदार पात्र ठरतील

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुरू असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणावरही (MLA Disqualification Case) त्यांनी भाष्य केले. बांगर म्हणाले, आमचे सर्व आमदार पात्र ठरतील असा मला विश्वास आहे. दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू झाली आहे. याबाबत नार्वेकर यांनी एक वेळापत्रक तयार करून सर्व आमदारांना पाठवले आहे. या वेळापत्रकानुसार पुढील सुनावणी आता 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Anil Parab : अध्यक्षांच्या वेळापत्रकात कुछ तो गडबड है ! परबांचा नेमका आरोप काय ? – Letsupp

असं आहे सुनावणीचं वेळापत्रक

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर दोन आठवड्यांत अंतिम सुनावणी होणार आहे. 25 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, स्वतंत्र पुरावा द्यायचा असल्याने त्याची वेगवेगळी सुनावणी घ्या अशी मागणी शिंदे गटाने केली होती. या गोष्टींचा विचार करून वेळापत्रक तयार करण्यात आले. सर्व आमदारांना वेळापत्रक दिले आहे. आता मात्र ठाकरे गटाकडून यावर आक्षेप घेतले जात असल्याने हे वेळापत्रकही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज