Deepak Kesarkar : ‘मंत्री झाल्यानंतर 25 कोटींची ऑफर’; केसरकरांच्या वक्तव्याने खळबळ !
Deepak Kesarkar : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलेल्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षण क्षेत्रात काय परिस्थिती आहे हेच त्यांच्या या विधानावरून स्पष्ट होत आहे. ज्यावेळी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी तुम्हाला वर्षाला 25 कोटी रुपये देतो असे सांगत काही एजंट माझ्याजवळ आले होते असे विधान केसरकर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. केसरकर यांनी कोल्हापुरात (Kolhapur News) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे धक्कादायक विधान केले.
‘…तर अधिकाऱ्यांचे हात-पाय तोडू’; बच्चू कडूंचा धमकीवजा इशारा…
याबाबत आधिक माहिती देताना केसरकर म्हणाले, मी जेव्हा माझ्या खात्याचा कार्यभार सांभाळला त्यावेळी माझ्याकडे असेच एजंट लोक आले होते. आम्ही तुम्हाला वर्षाला 25 कोटी रुपये देतो. तुम्ही ज्या शाळांना परवानगी देता, त्या आम्ही आणलेल्या शाळांना परवानगी द्या. पण, मी असे केले नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आम्ही जाहीर कार्यक्रम घेतो. फाइल आणि गुलाबाचे फूल देतो. कोट्यावधी रुपये कुणाला नको असतात असे बिलकुल नाही. पण, आमची काम करण्याची अशी पद्धत नाहीच असेही केसरकर यांनी ठणकावून सांगितले.
फक्त एजंटचे नाव सांगा, त्याच्यावर कारवाई करू
आम्ही नेहमीच जनतेसाठी काम करतो. अॅडमिशनसाठी तशी ऑफर आली होती. राज्याच्या राजधानीत आम्ही काम करतो. मुंबई ही मायानगरी आहे. मुंबई हे कमर्शियल भारताचे कॅपिटल आहे. म्हणून ते आमच्याशी संबंधित असतात असे आजिबात समजू नका. कोणत्याही एजंटला बळी पडू नका. त्या एजंटांचे काय करायचे त्याच्यासाठी आम्ही समर्थ आहोत तुम्ही फक्त आम्हाला नाव द्या आम्ही त्यांच्यावर जरूर कारवाई करू, असे आश्वासनही केसरकर यांनी दिले.
एकही शाळा खासगी करणार नाही
खासगी कंपन्यांच्या सीएसआर निधीतून शाळांच्या इमारतींची देखभाल दुरुस्ती आणि आवश्यक सोयासुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. शाळांच्या व्यवस्थापनात कोणताही बदल केला जाणार नाही. तसेच राज्यातील एकही शाळा खासगी केली जाणार नाही असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांनाही उत्तर दिले. शाळांच्या विकासासाठी कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारचे काही धोरण दिसते असेच केसरकर यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.
Deepak Kesarkar : ..तर मी पालकमंत्रीपदाचा राजीनामा देईन; केसरकरांनी कुणाला दिलं चॅलेंज ?