‘…तर अधिकाऱ्यांचे हात-पाय तोडू’; बच्चू कडूंचा धमकीवजा इशारा…

‘…तर अधिकाऱ्यांचे हात-पाय तोडू’; बच्चू कडूंचा धमकीवजा इशारा…

Bachchu Kadu : शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे हात-पाय तोडू, असा धमकीवजा इशाराच प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू(Bachchu Kadu) यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज भंडाऱ्यात गदर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या छोटेखानी सभेत कडू बोलत होते.

NCP : आता युतीत ताकद दाखवावीच लागेल नाहीतर.. पटेलांनीही दिले तयारीचे संकेत

बच्चू कडू(Bachchu Kadu) पुढे बोलताना म्हणाले, मी राज्यभरात आत्तापर्यंत 350 आंदोलने केली आहेत. अनेक आंदोलनांप्रकरणी माझ्यावर गुन्हेदेखील दाखल झालेले आहेत. आमदार असलो तरी शेतकऱ्याचा पोरगा आहे, शेतकऱ्यांच्या मागणीसाठी ही सभा कडूलिंबाच्या झाडाखाली होतेयं, अन् मी पण कडू आहे हे अधिकाऱ्यांनी विसरु नये, या शब्दांत कडू यांनी अधिकाऱ्यांना दमच भरल्याचं पाहायला मिळालं आहे.

Ajit Pawar : अजितदादा येताच पडळकर गायब; फडणवीसांच्या घरी नक्की काय घडलं?

तसेच शेतकऱ्यांवर अन्याय होत असेलतर आमच्यासारखे नालायक अवलाद नाही, शेतकऱ्यांना त्रास दिल्यास अधिकाऱ्यांचे हात-पाय तोडू, असंही ते म्हणाले आहेत. वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली. 12 ऑक्टोंबरपर्यंत निर्णय घेण्याचं ठरलं असून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यावर निलंबित करण्यात येईल, असं आश्वासन बच्चू कडू यांनी मोर्चेकराना यावेळी दिलं आहे.

केंद्रीय मंत्री मोठा की सचिव मोठा? कांदा प्रश्न बैठकीत उपस्थितांना पडला प्रश्न

भंडाऱ्यातील वन विभागातील जनावरांच्या हल्ल्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. इथल्या जनावरांमुळे अनेकदा शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस केली जाते, या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांनी शासनाकडून दिली जात नाही, त्यासाठी शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला होता.

हीच नफा कमावण्याची संधी; सर्वोच्च न्यायालयाने दिली व्यापाऱ्यांना ‘बिझनेस आयडिया’

राज्यात आक्रमक आंदोलन करण्यामध्ये बच्चू कडू अग्रेसर आमदार असल्याचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे, बच्चू कडू यांनी आत्तापर्यंत अशी अनेक आंदोलने केली असून विविध मागण्यांसाठी कडकू यांनी मंत्रालयातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचंही समोर आलं होतं. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला असून मुंबई न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

आत्तापर्यंत शेतकरी वर्ग, विद्यार्थी, दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू हे आंदोलन करण्यासाठी पुढे येत असतात, अशातच आता भंडारा जिल्ह्यातील वन विभागातील शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहुन कडू यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कडू यांच्या या विधानावर शासकीय कर्मचारी काही आक्षेप घेतील का? याबाबतची चर्चा सध्या सुरु झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube