NCP : आता युतीत ताकद दाखवावीच लागेल नाहीतर.. पटेलांनीही दिले तयारीचे संकेत

NCP : आता युतीत ताकद दाखवावीच लागेल नाहीतर.. पटेलांनीही दिले तयारीचे संकेत

NCP News : अजित पवार गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्याने राज्यातील राजकीय गणितेच बदलून गेली आहेत. ऐन निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर या घडामोडी घडल्याने जागावाटपाचा (NCP News) मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप यावर काही निर्णय घेतला गेला नसला तरी नेत्यांनी मात्र दबावाचे राजकारण सुरू केले आहे. आताही अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी भाजप आणि शिंदे गटाचे टेन्शन वाढविणारे वक्तव्य केले आहे.

मुंबईत अजित पवार गटाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेते आणि मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत पटेलांनी सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले, मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. म्हणजेच, महाराष्ट्राच्या 15 टक्के जागा एकट्या मुंबईत आहेत. हे विसरून चालणार नाही. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मिळून 60 जागा आहेत. एवढ्या मोठ्या प्रदेशात आपण राष्ट्रवादीला बळकट केलं नाही तर आपण महाराष्ट्रात मजबूत आहोत अस कसं सांगता येईल, असा सवाल त्यांनी केला.

‘तेव्हा मी नारायण राणेंसोबतच काँग्रेसमध्ये आलो’; जुना किस्सा सांगत वडेट्टीवारांनी नितेश राणेंना सुनावलं

आज आपण युतीत गेल्यानंतर आपली ताकद दाखविल्याशिवाय कुणी आपल्याला न्याय देईल अशी अपेक्षा कशी काय करता येईल. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच ताकद उभी करावी लागेल. त्याशिवाय हक्काने कोणतीच जागा मागता येणार नाही, असे पटेल म्हणाले.

अजित पवार गटाची स्ट्रॅटेजी क्लिअर ?

दरम्यान, पटेलांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीतील जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण काय असेल याचा अंदाज त्यांच्या या वक्तव्यावरून येत आहे. आता जरी त्यांनी मुंबई आणि ठाणे, पालघर जिल्ह्यांपुरतेच वक्तव्य केले असले तरी आगामी काळात अन्य विधानसभा मतदारसंघात अशीच स्ट्रॅटेजी असेल याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप जागावाटपाची चर्चा सुरू झालेली नाही. नेत्यांकडून मात्र मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. कोणत्या मतदारसंघात सध्या काय परिस्थिती आहे याची माहिती घेतली जात आहे. यंदा शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप यांच्यासह अन्य मित्रपक्षांचा विचार करून जागावाटप करावे लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

केद्रातील भाजपच्या हुकूमशाही कारभाराची शिंदे सरकारला लागण; पटोलेंचा घणाघात

follow us
  • fb
  • instagram
  • youtube