Maharashtra Weather Update : राज्यात आजपासून अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार (Maharashtra Weather Update) आहे. पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती मात्र (Weather Update) आता पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाले आहे. आजपासून 18 ऑगस्टपर्यंत काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत पाऊस कमी राहिल. हवामन विभागाने 18 ऑगस्टपर्यंत 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
कोकण, मराठवाड्यात विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर राहणार आहे. भंडारा, गडचिरोली, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. भंडारा, गडचिरोली, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नगरकरांनो सावधान! आजपासून तीन दिवस पावसाचे; जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी
नागरिकांनी अशा परिस्थितीत घराबाहेर न घोंडता सतर्क राहावं; प्रशासन आणि बचाव यंत्रणांनी पूर, व्यापार आणि रहदारी व्यवस्थापनासाठी सज्ज राहावं, ही विनंती संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडता, अलर्टची सतत माहिती घेत, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. फारच महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडता येईल.
कालपासून राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या भागात नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी या काळात सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सावधान! आज राज्यात ठिकठिकाणी मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांना मिळाला पावसाचा अलर्ट