Samruddhi Mahamarg Accident : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Mahamarg Accident) पहिला टप्पा (शिर्डी-नागपूर) राज्यातील जनतेसाठी सुरू होऊन काही महिनेच झाले आहेत. परंतु हा महामार्ग सातत्याने अपघातांमुळं चर्चेत असतो. काल मध्यरारत्री समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 6 वर्षाच्या चिमुकल्यासह 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सुमारे 23 प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, यावरून विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरलं. खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनीही शिंदे-फडणवीस-पवार सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले
AFMS Recruitment 2023 : AFMS मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या 650 जागांसाठी भरती सुरू
इम्तियाज जलील हे ठाण्यातील मुंब्रा परिसरात आले होते. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांवरून सरकारला चांगलेच धारेवर धरलं. ते म्हणाले, समृद्धीवरील अपघातांचे प्रमाणण वाढतचं चाललं आहे. माणसाच्या मृत्यूची किंमत स्वस्त झाली आहे. केवळ मुंबईत बसून घोषणा करणे योग्य नाही. सरकारने अपघाताचे स्पॉट निश्चित केले पाहिजे, असं जलील म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हत्येचा खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी थेट मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी देखील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. त्यावेळी देखील मी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा, असी मागणी केली होती. आताही तीच मागणी करत आहे, असं जलील म्हणाले.
दरम्यान, समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे.
या अपघातप्रकणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्याची घोषणा केली. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने योग्य उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
या अपघाताप्रकरणी आरटीओ अधिकारी प्रदीप छबुराव राठोड, नितीशकुमार सिद्धार्थ बोरणारकर यांच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. परिवहन विभागाच्या आयुक्तांनी दोन्ही अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केले.