AFMS Recruitment 2023 : AFMS मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या 650 जागांसाठी भरती सुरू

  • Written By: Published:
AFMS Recruitment 2023 : AFMS मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या 650 जागांसाठी भरती सुरू

AFMS Recruitment 2023 : तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतले असेल आणि उत्तम नोकरीच्य शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. कारण, नुकतीच सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (Armed Forces Medical Services) ने वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)पदांच्या जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 650 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सशस्त्र दल वैद्यकीय सेवा भरती 2023 साठी अर्जाची अंतिम तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

गुणरत्न सदावर्ते चिल्लर माणूस तर भुजबळ मराठा द्वेषी…; भाजप नेत्याचे टीकास्त्र 

आज प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. पण, स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं खूपच कठीण झालं आहे. त्यामुळं सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. मात्र, अशा लोकांसाठी AFMS ची भरती ही मोठी संधी आहे. 16 ऑक्टोबर 2023 पासून या भरतीसाठी अर्ज करण्याला सुरूवात झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागणार आहे.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

एकूण पदांची संख्या- 650

शैक्षणिक पात्रता –
सशस्त्र दल वैद्यकीय सेवा भरतीसाठी उमदेवारांचे वैद्यकीय शिक्षण हे मेडिकल कौन्सीलची मान्यता असलेल्या शैक्षणिक संस्थेतून झालेले असावे. उमेदवाराचे MBBS झालेले असावे. अनुभव असल्यास प्राधान्य.

वय – कमीत कमी 30 वर्ष
मागासवर्गीय उमदेवारांना भरतीसाठी वयात सवलत देण्यासंदर्भात नोटीफिकेशनमध्ये कुठलाही उल्लेख नाही.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज सुरू करण्याची तारीख – 16 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाइट – http://www.amcssentry.gov.in

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक – https://www.amcssentry.gov.in/

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1aZ2nBl2fXMXL5IHX8qIySTAqPu6nmoDl/view

भरतीसाठी आवश्यक असलेली महत्त्वाची कागदपत्रे –

वैध MCI/राज्य वैद्यकीय परिषद नोंदणी प्रमाणपत्र
वयाच्या पुराव्यासाठी मॅट्रिकचे प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला.

शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे/प्रमाणपत्रे.

जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्रासह

उत्पन्नाचा दाखला
अनुभव प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास)/प्राधान्य

पॅन कार्ड, आधार कार्ड झेरॉक्स
दोन फोटो

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube