बीडमध्ये बालविवाहाचा भांडाफोड, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी रचला सापळा

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या प्रभारी अधिकारी असलेल्या पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांना एक फोन आला.

News Photo   2026 02 08T140333.272

बीडमध्ये बालविवाहाचा भांडाफोड, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी रचला होत सापळा

बीडमधील नवरदेव पळून जातानाचा एक (Video) व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. अल्पवयीन मुलीसोबत लग्न करत असलेला हा नवरदेव सुसाट पळाला. मात्र हे प्रकरण कसं समोर आलं आणि मिलियन्समध्ये फॉलोअर्स असलेल्या पल्लवी जाधव यांनी कसा छडा लावलाय याची माहिती जाणून घेऊया.

सकाळी सकाळीच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या प्रभारी अधिकारी असलेल्या पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांना एक फोन आला. त्यांना अशी माहिती मिळाली की, 12 वाजता कपिलधार देवस्थान (ता. जि. बीड) येथे एका 16 वर्षाच्या मुलीचा बालविवाह होणार आहे. त्यावरून पल्लवी जाधव या साध्या वेशामध्ये टीमसह तिथं दाखल झाल्या. त्याठिकाणी दोन-तीन लग्नकार्य सुरु होती. माणसांची पण खूप गर्दी होती, म्हणून सर्व टीम पहिल्या हॉलमध्ये दाखल झाली. तिथं गेल्यावर पल्लवी जाधव यांनी एका महिलेला नवऱ्या मुलीचे नाव विचारले असता तिने मुलीचे नाव चुकीचे सांगितले. टीम तेथून बाहेर पडणार तोच मुलीचे आडनाव विचारले तर ते बरोबर सांगितलं.

निवडणुकीच्या निकालाआधीच चित्र स्पष्ट; पुणे जिल्ह्यावर पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व

उपस्थित लोकांनी नाव चुकीचे सांगितले म्हणून पोलिसांची टीम तिथून जाणार होती. मात्र आडनावावरुन त्यांना संशय आला. अधिक तपास केला असता तीच मुलगी असल्याचे समोर आले. यानंतर मुलीला ताब्यात घ्यायला टीम जाणार तोच वऱ्हाडी मंडळींना पोलीस असल्याचा संशय असल्याने त्यांची पळापळ सुरु झाली. एवढ्या गर्दीत पल्लवी जाधव यांनी मुलीला ताब्यात घेतले व गर्दीचा फायदा घेऊन नवरदेव मुलगा पळून गेला. हॉलमध्ये हजर असलेल्या व पळणाऱ्या लोकांना थांबायला सांगून त्यांना पल्लवी जाधव यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम बाबत जन जागृतीपर मार्गदर्शन केले.

पीडित मुलीला विश्वासात घेवून तिचे समुपदेशन केले. सदर पीडित मुलीचे आई-वडील व मामा तसेच नवरदेव राजेंद्र शिंदे व त्याचे आई वडील फरार झाल्याने त्याच्या नातेवाईकांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला. यानंतर प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बीडमध्ये बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत सतत जनजागृती करुनही प्रशासनाला असे विवाह थांबवण्यात का अपयश येत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून व्हिडीओदेखील पुरावा म्हणून जोडण्यात आला आहे.

Exit mobile version