छत्रपती संभाजीनगरमधील देवळाई परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. (Sambhajinagar) येथे एका विवाहितेवर पती आणि दोन भाच्यांकडून वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. मुलीच्या वाढदिवसानिमित्त घरात आलेल्या भाच्यांसोबत पतीने तिला दारू पाजून जबरदस्ती केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
हा प्रकार जुलै 2024 पासून ते मे 2025 पर्यंत सुरूच राहिल्याचे तिच्या तक्रारीत म्हटले आहे. तसंच, अत्याचाराचा अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणातील गुन्हा सुरुवातीला नवी मुंबई येथे दाखल झाला होता. त्यानंतर तो चिकलठाणा पोलिसांकडं वर्ग करण्यात आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
धक्कादायक! बीडमध्ये बनावट आधार काढल्याची तक्रार, निवडणूक अधिकाऱ्यांनी काढलं पत्र
30 वर्षीय महिला देवळाई भागात राहते. तिच्या मुलीच्या वाढदिवसाला पतीचे दोघे भाचे (यापैकी एक अल्पवयीन) घरी आले होते. त्या दिवशी पतीने पत्नीला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावले आणि तिच्यावर अत्याचार केला. नंतर दोन्ही भाच्यांनीही तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराचा एका भाच्याने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्याच्या आधारे तिला धमकावून शांत बसवले, असं पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
ही माहिती उघड करत तिने नवी मुंबईत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, या प्रकरणाला दुसरी बाजूही पुढे आली आहे. चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन भाच्याने सप्टेंबरमध्ये तक्रार दिली होती की, मामीने त्याच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्या तक्रारीवरून पोक्सो कायद्यान्वये मामीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पुढे हा प्रकार पतीच्या लक्षात आला आणि भाच्यावर अत्याचार होत असल्याची माहिती समोर आली आहे.
