Jalna Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. जालना जिल्ह्यातून (Jalna Road Accident) भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. गुरुवारी सकाळी जालना-वडीगोद्री मार्गावर मठ तांडा येथे एसटी बस आणिम मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, मागील आठवड्याच असाच एक भीषण अपघात धुळे जिल्ह्यात घडला होता. या अपघातातही पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता.
Dhule Accident : पिकअप अन् ईकोचा अपघात, वाहनाचा चक्काचूर; पाच जण जागीच ठार
मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात जालना आणि वडीगोद्री मार्गावर झाला. या मार्गावरील एसटी बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. या बसने अचानक मोसंबीने भरलेल्या ट्रकला जोराची धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बसचा समोरील भाग पूर्ण उद्धवस्त झाला. ही बस गेवराईहून अंबडकडे चालली होती. बसमध्ये अनेक प्रवासी अडकून पडले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेतली. जखमींना बसमधून बाहेर काढले आणि अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातातील जखमी प्रवाशांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. यातील काही प्रवासी गंभीर अवस्थेत आहेत. त्यामुळे मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून मृतांच्या कुटुंबियांना सूचना देण्यात आल्या आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अजून तरी स्पष्ट झालेले नाही.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गेवराईहून अंबडकडे जाणाऱ्या बसची मोसंबी वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघातात काही जण जखमी झाले आहेत. 14 ते 15 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
Kolhapur Accident : कोल्हापुरात भीषण अपघात, कंटेनरची 7 वाहनांना धडक
दरम्यान, रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव (Road Safty) असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. परंतु त्यानुसार कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे.