Jalna Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोन कारच्या धडकेत सात प्रवासी जागीच ठार

Jalna Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोन कारच्या धडकेत सात प्रवासी जागीच ठार

Jalna Road Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबता थांबत नाही. हा महामार्ग मृत्यूचा (Samruddhi Mahamarg) सापळा ठरू लागला आहे इतके अपघात या महामार्गावर होत आहेत. आताही (Jalna Road Accident) एक भीषण अपघाताची बातमी धडकली आहे. जालना हद्दीतील (Jalna News) समृद्धी महामार्गावरील या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या इर्टिगा कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कारची धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की दोन्ही कार महामार्गावरील बॅरिकेट्स तोडून खाली गेल्याची माहिती आहे.

काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर कडवंची गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यातील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्गा पोलीस आणि जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनांतून मृतदेह बाहेर काढले. तसेच जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकांद्वारे रुग्णालयात पाठवण्यात आले. क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आल्या. काही वेळानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

Road Accident : कुटुंबावर काळाचा घाला! भीषण अपघातात तिघे ठार, 5 जण जखमी

रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातही असेच घडले होते. गौरी गणपतीच्या सणासाठी कुटुंब पुण्याहून अमरावतीकडे निघाले होते. समृद्धी महामार्गावर असताना अचानक वन्यप्राणी आडवा आला. या प्राण्याचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात कार तीन वेळा पलटी झाली. कारची वेगात होती. त्यामुळे वेगातच पलटी झाली. या अपघातात कुटुंबातील महिला ठार झाली. तर अन्य तीन प्रवासी जखमी जखमी झाले. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.

पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीची धडक, पाच जणांचा मृत्यू

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube