Download App

मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचे हिंगोलीत तीव्र पडसाद; सरकारी गोदाम पेटून दिले

Jalna Lathi charge : जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. हिंगोलीतही (Hingoli) काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी सेनगाव (Sengaon) येथे धान्याच्या शासकीय गोदामाला आग लावण्यात आली. तसेच शासकीय वाहनही जाळण्यात आले आहे. या घटनेत एकूण 3 लाख 88 हजार 600 रुपयांचे नुकसान झाले.

या प्रकरणीत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ता रोको करण्यात आले. तर सेनगाव येथे दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. रविवारी आखाडा बाळापूर, दिग्रस आणि कऱ्हाळे येथे रास्ता रोको झाले. उद्या सोमवारी मराठा समाजाने हिंगोली जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. उद्याचा बंद शांततेत पार पडावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक घेतली.

Jalna Maratha Protest : आरक्षण कसं दिलं जातं हे माहितीये का? गिरिश महाजन पवार-ठाकरेंवर बरसले

सेनगाव येथे अज्ञातांनी रास्त भाव दुकानाच्या शासकीय गोदामास आग लावली. यामध्ये बारदाना 21 हजार पोते, तांदळाने भरलेले 102 कट्टे जळून खाक झाले. यामध्ये एकूण 2 लाख 88 हजार 600 रुपयांचे नुकसान झाले. तसेच संतप्त आंदोलकांनी तहसील कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या सरकारी वाहनाला आग लावली. यामध्ये एक लाखाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी दिलीप भीमराव कदम (गोदामपाल) यांच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपींविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Tags

follow us