जालना : गेल्या 17 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) त्यांचे उपोषम मागे घेतले आहे. दोन दिवासांपूर्वी जरांगेंनी उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अंतरवाली सराटीत यावे अशी अट टाकली होती. त्याप्रमाणे आज (दि.14) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सराटी गावात दाखल झाले. जरांगेंशी चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) त्यांच्या हस्ते फळांचा ज्युस जरांगेंना दिला. शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना सराटी गावात आणून दाखवल असे म्हणत आरक्षण मिळेपर्यंत शिंदेंचा पिछा सोडणार नसल्याचे जरांगे म्हणाले. त्यांच्या या इशाऱ्यामुळे उपोषण मागे घेतल्यानंतरही जरांगेंचा आरक्षणाबाबतचा जोश कायम असल्याचे दिसले.
Vijay Vadettivar : ट्रीपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड; वडेट्टीवारांची टीका
तोपर्यंत शिंदेंना सोडणार नाही
उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे पाटलांनी उपस्थितांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, या आरक्षणाबाबत धाडसी निर्णय घेण्याची क्षमता केवळ एकनाथ शिंदेंमध्ये आहे. त्यामुळे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदेंची पाठ सोडणार नाहीये. जीव गेला तरी चालेल, पण मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता शांत बसणार नसल्याचे जरांगे म्हणाले.
Maratha Reservation : ‘आरक्षणाचा जसा खेळखंडोबाच मांडलायं’; मनोज जरांगे पाटील चिडले
सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. तोपर्यंत काही बोलणार नाही. त्यापुढे एक पाऊल पुढे टाकत समाजालाच्या वतीने आणखी दहा दिवस वाढवून देतो. पण येथून पुढे आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे जरांगे म्हणाले. मी तुमच्याशी प्रामाणिक असून आरक्षण मिळवून देण्यावर मी ठाम आहे. मी तसले धंदे करत नाही, मी तशी औलाद नाही. मी मराठा समाजासोबत पारदर्शक आहे, मी मराठा समाजासोबत गद्दारी करणार नसल्याचेही जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांसोबर ठणकावून सांगितले
मुख्यमंत्र्यांना सराटी गावात आणणारे जरांगे कोण?
मराठा आरक्षणासाठी गेल्या 17 दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील हे मुळचे बीड जिल्ह्यातील आहेत. पोटापाण्यासाठी ते जालना येथे आळे आणि एका हॉटेलमध्ये काम करू लागले आणि येथेच स्थायिक झाले. मराठा समाजाच्या आरक्षणाचे खंबीर समर्थक असलेले मनोज जरांगे पाटील हे अनेकदा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध नेत्यांना भेटलेल्या शिष्टमंडळांचा भाग आहेत.