Vijay Vadettivar : ट्रीपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड; वडेट्टीवारांची टीका
Vijay Vadettivar : विधान सभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettivar) यांनी राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवरून राज्यसरकारवर टीका केली आहे. ट्विटरच्या माध्यामातून त्यांनी हा निशाणा साधला आहे. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निष्क्रीय आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर अर्धे उपमुख्यमंत्री म्हणत टीका केली आहे.
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश, मनोज जरांगेंचे उपोषण मागे
ट्रीपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड…
राज्य सरकारवर टीका करताना वडेट्टीवारांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘ट्रीपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड जातोय. कर्नाटकमधील 195 काँग्रेस सरकार आज तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार आहे. इकडे महाराष्ट्रात मात्र सरकार बेधुंद वागतंय. शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळालेला नाही. कर्जाचे पुनर्गठन सरकारने केलेले नाही. मग, महाराष्ट्र सरकार काय करतंय ? जनतेच सरकार म्हणून थापा मारणारे मुख्यमंत्री निष्क्रिय बसून आहे.’ अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
ट्रीपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड जातोय.
कर्नाटक मधील काँग्रेस सरकार आज १९५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार आहे.
इकडे महाराष्ट्रात मात्र सरकार बेधुंद वागतंय.
शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळालेला नाही.
कर्जाचे पुनर्गठन सरकारने केलेले नाही.
मग, महाराष्ट्र…— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 14, 2023
तर पुढे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर देखील त्यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, अर्धे उपमुख्यमंत्री नुकतेच जपान फिरून आले आणि आता राजस्थान निवडणूक प्रचारात व्यस्त आहे. अर्धे उपमुख्यमंत्री त्यांच्या अखत्यारीत न येणाऱ्या खात्यांच्या बैठका घेऊन स्वतःच्या आमदारांसाठी निधी पळवण्यात व्यस्त आहे. दुष्काळाने शेतकरी होरपळतोय त्याच्याकडे सरकारचं लक्ष कधी जाणार? सत्तेत बसून स्वतःची कामे करून घेण्याच्या नादात या सरकारने शेतकऱ्यांचा डब्बा आता सोडला असे चित्र स्पष्ट दिसत आहे.
इंडिया आघाडीमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींना धडकी…
दरम्यान राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खरिपाच्या सर्वच पीकांना पाऊस नसल्याचा मोठा फटका बसला आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट तसेच सप्टेंबर महिना देखील अर्धा संपत आला आहे. मात्र अद्याप देखीव पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या देखील समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे सध्या सर्वच स्तरावरून दुष्काळ जाहिर करण्याची मागणी होत आहे. त्यात दुष्काळाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष देखील आक्रमक झाला आहे.