Download App

सगळ्यांना वेठीस धरणारा जरांगे कोण? दिल्लीकरांना पडलेल्या प्रश्नाचा शिंदेंनी सांगितला किस्सा

  • Written By: Last Updated:

जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषणाला बसले होत. त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारने अनेक गोष्टी केल्या, जीआर काढले. मात्र, जरांगेंनी सरकारी जीआर नाकारत उपोषण चालूच ठेवण्याचा निर्धार केला. आरक्षणासाठी सरकारच्या डोक्यावर बसलेल्या मनोज जरांगे उपोषण मागे घेत नसल्याने सरकार समोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. सरकारला वेठीस धरणारे जरांगे नेमके कोण असा प्रश्न अनेकांना पडला होता. तसाच काहीसा प्रश्न दिल्लीकरांनाही पडला होता असा किस्सा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सराटी गावात सांगितला.

Maratha Reservation : ‘आरक्षणाचा जसा खेळखंडोबाच मांडलायं’; मनोज जरांगे पाटील चिडले

जरांगेंच्या तब्बेतीची काळजी सर्वांना आहे. हायकोर्टानेदेखील जरांगेच्या तब्बेतीची नोंद घेतल्याचे शिंदे म्हणाले. म्हणजे याचा अर्थ तु किती महत्त्वाचा आहेस हे कळते असे उद्गार शिंदेंनी जरागेंसाठी काढले. परवाच्या दिवशी मी दिल्लीत गेलो होतो. तेथेही अनेकांनी ये मनोज जरांगे पाटील है कौन? असा प्रश्न मला केला. शिंदेंच्या या विधानानंतर उपस्थितांनामध्ये एकच हशा पिकला. त्यावर मी उत्तर दिले की, जरांगे पाटील खूप साधा कार्यकर्ता असल्याचे उत्तर दिल्याचे शिंदेंनी यावेळी सांगितले. त्यावर उपस्थितांनी उसने तो सबको हिला दिया है अशी प्रतिक्रिया दिला. प्रामाणिकपणा असल्याने दिल्लीतील लोकांनाही तुमची दखल घ्यावी लागली. तुमचा आणि आमचा दोघांचाही हेतू खरा असल्याने अनेकांनी या आंदोलनाची दखल घेतल्याचे शिंदे म्हणाले.

नागपूरमध्ये दिवाळीपूर्वीच फुटणार फटाके; RSS च्या बालेकिल्ल्यात होणार ‘इंडिया’चे शक्तिप्रदर्शन

वडिलांचा किस्सा सांगितला

दिल्लीतील किस्सा सांगण्याबरोबरच एकनाथ शिंदेंनी यावेळी त्यांच्या वडिलांचाही किस्सा सांगितला. ते म्हणाले की, हा एकनाथ शिंदेदेखील गरिब शेतकरी कुटुंबाच्या घरात जन्मलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे तुमच्या भावनांची मला जाणीव आहे. मी मागे एकदा साताऱ्याला गेलो होतो, तेव्हा मागील मराठा आंदोलन सुरू होते. वडील सगळी तयारी करत होते. त्यांना मी कुठे चाललाय असे विचारले. त्यावर मी आपल्या मोर्चात चाललोय असे उत्तर दिले. कुठला मोर्चा असे विचारले असता वडिलांनी मराठा क्रांती मोर्चा असे सांगितले. ते आंदोलनात येतात, एवढी आपली समाजाबद्दल अटॅचमेंट आहे.

कर्नाटकमध्ये 195 तालुक्यांत दुष्काळ जाहीर होणार; महाराष्ट्रात शिंदे सरकारच्या निर्णायकडे राज्याचे लक्ष

शब्द मोडणार नाही

यावेळी शिंदेंनी गेल्या 17 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांना तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले. ज्यांचा हेतू शुद्ध, प्रामाणिक असतो त्यांच्याच मागे जनता उभी राहत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मी उपोषण सोडण्याची विनंती केली आणि तुम्ही ती मान्य केली, या बद्दल मी आपले आभार मानतो. मनोज जरांगे यांनी पुढील दोन ते तीन दिवस दवाखान्यात उपचार घ्यावे. त्यावर आपण संध्याकाळी दवाख्यात जाऊन उपचार घेणार असल्याचे म्हणत दिलेला शब्द मोडणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंना दिला.

Tags

follow us